color-stripe
logo

२६ नोव्हेंबर २०१८

लेखक-प्रकाशक संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, नागपूर, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकांच्या गावात भिलार येथे ८ आणि ९ डिसेंबर रोजी लेखक-प्रकाशक संमेलन होणार आहे. सांस्कृतिक आणि शालेय शिक्षणमंत्री मा. विनोद तावडे, व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा समारंभ होणार आहे. डाॅ. आशुतोष जावडेकर, डाॅ. श्रीपाल सबनीस, मा. बाबा भांड, ग्रंथालय संचालक राठोड साहेब यांसारख्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून हे संमेलन संपन्न होणार आहे. प्रतिभासंपन्न मायलेकी वीणा देव आणि मृणाल देव-कुलकर्णी यांच्याशी संवाद, त्याचप्रमाणे गदिमा, पुल., बाबूजी जन्मशताब्दीनिमित्त दृकश्राव्य कार्यक्रम अशीही अनेक आकर्षणे या संमेलनात आहेत. या संमेलनाकरिता पुणे-भिलार-पुणे असा ८ व ९ डिसेंबर या दोन्ही दिवसांचा प्रवास, उत्कृष्ट निवास, भोजन आणि इतर सोयी याकरिता माफक असे केवळ रु. १५००/- एवढे शुल्क ठेवण्यात आले आहे. आपण या संमेलनात सहभाग घ्यावा याकरिता मुद्दाम मी व्यक्तीशः हे निवेदन आपणास पाठवित आहे. *हे संमेलन लेखक-प्रकाशक व साहित्यप्रेमींच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल असा विश्वास वाटतो.* नोंदणीकरिता (१) श्री. पराग लोणकर (कार्यवाह- प्रकाशक संघ) - ९८५०९६२८०७ किंवा (२) श्री. भास्कर ढोबळे (कार्यालयीन कार्यवाह) - ७३५००१५७५६ यांच्याशी संपर्क साधावा. या संमेलनाकरिताचे शुल्क आपण अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या खालील बँक खात्यात परस्पर भरू शकता. खात्याचा तपशील:- *अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ* बँक ऑफ महाराष्ट्र, शनिवार पेठ शाखा, पुणे. A/C No. 20136942733 IFSC Code MAHB 0000675 खात्यात शुल्क जमा केल्यानंतर कृपया वरीलपैकी एका क्रमांकावर जरूर कळवावे. आपला राजीव बर्वे अध्यक्ष- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ


२५ ऑक्टोबर २०१८

*पुस्तकांचे गाव- भिलार* येथे दोन दिवसांची (निवासी) लेखक-प्रकाशक कार्यशाळा

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, अखिल भारतीय साहित्य महामंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ८ व रविवार दिनांक ९ डिसेंबर २०१८ रोजी *पुस्तकांचे गाव- भिलार* येथे दोन दिवसांची (निवासी) लेखक-प्रकाशक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसात प्रकाशन व लेखन क्षेत्राशी निगडीत विविध विषयांवर मार्गदर्शक सत्रे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून *शालेय व उच्च शिक्षण मंत्री माननीय श्री. विनोदजी तावडे* यांची सन्माननीय उपस्थिती लाभण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. आणखीही काही महत्वाच्या व्यक्ती येत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष *डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी* हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. *तरी सर्वांनी वरील दोन तारखांची नोंद करून ठेवावी.* पुणे ते भिलार व भिलार ते पुणे जाण्या-येण्याची सोय प्रकाशक संघातर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याबरोबरच बाहेरगावची मंडळीही पुण्यावरूनच एकत्रित प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. ८ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता पुण्यावरून निघून ९ डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत आपण पुण्यात परत येऊ. (अर्थात ज्यांना थेट भिलार येथे यायचे असेल ते तसे येऊ शकतातच.) येण्या जाण्याच्या सोयीबरोबरच दिनांक ८ रोजीच्या सकाळच्या न्याहारीपासून ते दि. ९ रोजीच्या संध्याकाळच्या चहापानापर्यंत सर्व सोयी केल्या जाणार आहेत. निवासासाठीही पुस्तकांच्या गावात व अगदी जवळपासच्या भागांत उत्तम सोय केली जाणार आहे. ८ व ९ डिसेंबरची भिलारची कार्यशाळा ही सर्वार्थाने चुकवू नये अशी असणार आहे. दोन पूर्ण दिवसांच्या या कार्यशाळेत लेखक-प्रकाशक व एकूणच साहित्यव्यवहाराशी संबंधित प्रत्येकासाठी अनेक अशा विषयांचा उहापोह केला जाणार आहे ज्यांचा यापूर्वीच्या कार्यशाळांत विचार केला गेला नव्हता. अनेक सत्रांच्या भरगच्च अशा उत्तम कार्यक्रमांत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवर वक्ते उपस्थित रहाणार आहेत. आधीच्या निवेदनांत सांगितल्याप्रमाणे या उत्कृष्ट कार्यशाळेबरोबरच पुणे ते पुणे प्रवास व सुंदर भोजन-निवासादी व्यवस्थाही करण्यात येणार आहे. या सर्वांसाठी मोठा खर्च येणार असूनही आधी सांगितल्याप्रमाणे प्रकाशक संघाने या कार्यशाळेकरिता नाममात्र शुल्क ₹ १,५००/-फक्त (पुणे ते पुणे प्रवास, भिलार येथील निवास व भोजनांसहित) एवढे किरकोळ आकारण्याचे ठरवले आहे.मर्यादित नोंदणी असल्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर आपले शुल्क भरुन नोंदणी करावी ही विनंती! अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क :- श्री. भास्कर ढोबळे (कार्यालयीन कार्यवाह) :- ७३५००१५७५६ किंवा पराग लोणकर :- ९८५०९६२८०७.


१२ सप्टेंबर २०१८

लेखक व प्रकाशक कार्यशाळा, जळगाव

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे डॉ. अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथे शुक्रवार दि. ७ व शनिवार दि. ८ सप्टेंबर २०१८ रोजी (दोन दिवस) लेखक व प्रकाशकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लेखन आणि प्रकाशन, संपादनाची आवश्यकता, स्वयंसंपादन, पुनर्लेखन, मुद्रितशोधन, ग्रंथनिर्मिती प्रक्रिया, प्रकाशनासाठी कॉपी तयार करणे, जीएसटी आणि कॉपीराइट कायदा, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आव्हान, ई बुक्स, पुस्तक व्यवसायाचे अर्थकारण- विक्री आणि विपणन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. पद्मश्री जेष्ठ कवी आणि साहित्यिक ना. धो. महानोर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक संचालक डॉ. केशव तुपे तसेच मार्गदर्शनासाठी प्राचार्य डॉ. एस. एस. राणे , प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे व प्रकाशक संघाचे सदस्य सुकुमार बेरी, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, दत्तात्रय पाष्टे, युवराज माळी हे उपस्थित होते.


१० सप्टेंबर २०१८

युनिकोड कार्यशाळा

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, राज्य मराठी विकास संस्था व फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी प्रकाशक व अक्षरजुळणीकारांसाठी युनिकोड कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये प्रकाशक व अक्षरजुळणीकार यांसाठी दोन वेगवेगळ्या विभागात एकाच वेळी दोन सत्रे घेण्यात आली. संपूर्ण कार्यशाळेत युनिकोडचा वापर कसा करावा, मोफत उपलब्ध असलेले फॉन्ट डाउनलोड कसे करावेत, नि:शुल्क उपलब्ध असणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर कसा करावा? ई बुक निर्मिती, जुनी पुस्तके वेबवर आणणे, विकी प्रकल्पांद्वारे मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देणे, पुस्तकांचे सोशल मार्केटिंग कसे करावे? अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनासाठी खालील ज्येष्ठ व श्रेष्ठ तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित होत्या व त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री माधवराव गाडगीळ, एमकेसीएलचे कार्यकारी संचालक श्री. विवेक सावंत, डॉ. आनंद काटीकर संचालक, राज्य मराठी भाषा विकास परिषद, मराठी प्रकाशनांचे ई-भविष्य : डॉ. सुनीलकुमार लवटे, ई-पुस्तकाचे विपणन (सोशल मार्केटिंग) : डॉ. दीपक शिकारपूर, विकी-प्रकल्पांद्वारे पुस्तके महाजालावर उपलब्ध करणे : श्री. सुबोध कुलकर्णी, युनिकोडचा वापर : सुशांत देवळेकर, मनीष बावकर, विकास कांबळे, रोहित कोकीळ, संगणकीय दृश्यमांडणीसाठी मुक्त आज्ञावल्यांचा वापर (गिम्प, इंकस्केप, लाटेक्-टिक्झ) : मनीष बावकर, विकास कांबळे, रोहित कोकीळ,


२० ऑगस्ट २०१८

लेखक व प्रकाशक कार्यशाळा, जळगाव

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे डॉ. अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथे शुक्रवार दि. ७ व शनिवार दि. ८ सप्टेंबर २०१८ रोजी (दोन दिवस) लेखक व प्रकाशकांसाठी विशेष कार्यशाळा होणार आहे. लेखन आणि प्रकाशन, संपादनाची आवश्यकता, स्वयंसंपादन, पुनर्लेखन, मुद्रितशोधन, ग्रंथनिर्मिती प्रक्रिया, प्रकाशनासाठी कॉपी तयार करणे, जीएसटी आणि कॉपीराइट कायदा, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आव्हान, ई बुक्स, पुस्तक व्यवसायाचे अर्थकारण- विक्री आणि विपणन आदी विषयांवर ही कार्यशाळा असेल. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी पुण्या-मुंबईची अनुभवी, तज्ञ मंडळी जळगाव येथे येत आहेत. या मंडळींशी संवाद साधण्याची संधीही प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे. जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार व औरंगाबाद या पाच जिल्ह्यातील आपल्या माहितीचे जे लेखक व प्रकाशक असतील त्यांना कृपया या अतिशय चांगल्या व उपयुक्त कार्यशाळेसाठी सहभागी होण्यास सांगावे. दोन दिवसांच्या या कार्यशाळेसाठी चहा, न्याहारी व भोजन या सर्वांसह केवळ ₹ १००/- एवढे नाममात्र शुल्क प्रकाशक संघाने मुद्दाम ठेवले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी दि. ५ सप्टेंबर पूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :- श्री. युवराज माळी, जळगाव. (+91 97 64 694797)


१८ ऑगस्ट २०१८

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे महत्वाची कार्यशाळा.

विषय :- युनिकोड विषयक कार्यशाळा

दिनांक १७ जून २०१८ रोजी संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या 'जीवनगौरव', 'साहित्यसेवा कृतज्ञता' व 'उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती' पुरस्कार सोहळ्यामध्ये युनिकोड टाइप याविषयी प्रकाशकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या नवीन तंत्रज्ञानाची उपयुक्तता उपस्थित सर्वच प्रकाशकांच्या चांगलीच लक्षात आली. मात्र याबाबत अधिक सखोल व हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष उपयोगात आणता येईल अशा ज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी एक स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात यावी अशी उपस्थित सर्वच प्रकाशकांनी प्रकाशक संघाला विनंती केली होती. प्रकाशकांच्या या विनंतीला मान देऊन प्रकाशन संघाने शुक्रवार, दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजी संपूर्ण दिवसभराची युनिकोड विषयक कार्यशाळा आयोजित केली आहे. मार्गदर्शनासाठी खालील ज्येष्ठ व श्रेष्ठ तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. १) मा. लक्ष्मीकांत देशमुख २) पद्मश्री माधव गाडगीळ - ज्येष्ठ शास्त्रज्ञ ३) श्री. विवेक सावंत - एमकेसीएलचे कार्यकारी संचालक ४) श्री. दीपक शिकारपूर - आय.टी. तज्ज्ञ ५) श्री. सुबोध कुलकर्णी - आय.टी. तज्ज्ञ ६) श्री. अानंद काटीकर - संचालक, राज्य मराठी भाषा विकास परिषद. ७) श्री. सुशांत - राज्य मराठी भाषा विकास परिषद ८) श्री. कुलभूषण बिरणाले - राज्य मराठी भाषा विकास परिषद. कार्यक्रमाचा दिनांक :- ७ सप्टेंबर २०१८ कार्यक्रमाची वेळ :- सकाळी ९.३० ते सायंकाळी ६. कार्यक्रमाचे शुल्क :- रुपये ३०० . (यामध्ये दोन वेळचा चहा, नास्टा, दुपारचे भोजन व प्रशिक्षण शुल्क व प्रशिक्षण साहित्य यांचा समावेश आहे. जास्तीत जास्त प्रकाशकांना आणि त्यांचेकडील आॅपरेटर्सना सहभाग घेता यावा म्हणून संघाने खर्चाच्या मानाने शुल्क अत्यंत अल्प ठेवले आहे हे कृपया लक्षात घ्यावे.) ज्या ज्या प्रकाशकांना स्वतःला येणे शक्य नसेल त्यांनी आपल्या संस्थेत/संस्थेसाठी काम करणाऱ्या अक्षरजुळणीकारांना (डीटीपी ऑपरेटर) जरूर पाठवावे. हे सारेच प्रशिक्षण प्रकाशकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे हे आपण जाणताच! या कार्यशाळेसाठी नोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१८. नोंदणीसाठी प्रकाशन संघाचे कार्यालयीन कार्यवाह श्री. भास्कर ढोबळे (भ्रमणध्वनी:- ७३५००१५७५६) यांच्याशी संपर्क साधावा.


१ ऑगस्ट २०१८

महत्त्वाची सूचना

प्रकाशक संघाची आजीव सभासद वर्गणी रु. ३०००/- आहे हे सर्वांना माहित आहेच. ९० प्रकाशक आजीव सभासद आज ३० जुलै अखेर झाले आहेत. रु. ३०००/- मध्ये आजीव सभासद होण्याची ही शेवटची संधी आहे. दि. ३१ ऑगस्ट २०१८ पासून आजीव सभासद वर्गणी रु. ५०००/- अशी होणार आहे. असा कार्यकारिणीचा ठराव झाला आहे. रु. ३००/- (सामान्य सभासद) अगर रु. ५००/- (सक्रिय सभासद) वर्गणी यावर्षीची आपण दिली असेल तर रु. ३०००/- मधून तेव्हढी रक्कम कमी द्यावयाची आहे. म्हणजेच आपण यावर्षी सक्रिय सभासद होण्यासाठी रु. ५००/- भरले असतील तर आजीव सभासद होण्यासाठी रु. २५००/- चाच चेक द्यावा अगर प्रकाशक संघाच्या बँक A/C वर रक्कम भरावी. १ सप्टेंबर नंतर मात्र आजीव सभासद वर्गणी रु. ५०००/- इतकी होईल. आपण आजीव सभासद वर्गणीचा चेक पाठविणार असल्यास 'अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ' या नावाने पाठवावा. बँकेत रक्कम भरणार असल्यास 'डिटेल्स' पुढीलप्रमाणे : बँक ऑफ महाराष्ट्र, शनिवार पेठ शाखा, पुणे A/C No. 20136942733 IFSC Code MAHB0000675 - श्री. भास्कर ढोबळे (कार्यालयीन कार्यवाह)


२ जुलै २०१८

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या सर्व सभासदांना निवेदन

१ एप्रिल २०१८ पासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षाची वर्गणी ज्या सभासदांची राहिली असेल त्यांनी ती कृपया त्वरित भरावी ही विनंती. १) सर्वसामान्य सभासद रु.३००/- २) सक्रीय सभासद रु.५००/- ३) आजीव सभासद रु.३०००/- या प्रमाणे वर्गणीचा चेक प्रकाशक संघाच्या कार्यालयात त्वरित पाठवावा किंवा ही वर्गणी आर.टी.जी.एस./एन.इ.एफ.टी. व्दारे प्रकाशक संघाच्या खात्यात जमा करण्यात यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयीन कार्यवाहक श्री. भास्कर ढोबळे यांच्याशी संपर्क करा.


१८ जून २०१८

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे परचुरे प्रकाशन मंदिरचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्कार आणि जेष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये आणि प्रमुख कार्यवाहक नितीन गोगटे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१७ आणि उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सोहळा १७ जून २०१८ रोजी ‘मराठा चेंबर ऑफ कॅामर्स’च्या पद्मजी सभागृहात संपन्न झाला.