Press "Enter" to skip to content

 १ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या कार्यशाळेच्या नोंदणी संदर्भात!

नमस्कार!

आपल्या या कार्यशाळेसाठीची नोंदणी चालू आहे.

विषय : ईबुक आणि किंडल आवृत्ती : तंत्र, मंत्र आणि व्यवसायातील संधी

(रविवार दिनांक १ ऑक्टोबर २०२३)

स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे

वेळ : सकाळी ९.३० ते अंदाजे २.००

मार्गदर्शक : श्री. माधव शिरवळकर (तंत्रज्ञान विषयक पुस्तकांचे लेखक आणि माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक)

कार्यशाळा शुल्क: रु. ३००/-

सभागृहाची आसनक्षमता मर्यादित असल्याने कृपया लवकरात लवकर नोंदणी करावी ही विनंती.

प्रकाशक संघाच्या पुढील खात्यात किंवा 9881435680 या क्रमांकावर जीपेने रु. ३००/- भरून संघाच्या कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे यांच्या याच whatsapp क्रमांकावर शुल्क भरल्याचे (आठवणीने) कळवून आपली नोंदणी निश्चित करावी ही विनंती.

प्रकाशक संघाच्या खात्याचा तपशील:-

खात्याचे नाव:- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.

बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा:- शनिवार पेठ, पुणे.

बचत खाते क्र:- २०१३६९४२७३३

IFSC:- MAHB0000675

– प्रमुख कार्यवाह

दि. १ ऑक्टोबर रोजीच्या कार्यशाळेचा साधारण आराखडा

१) कार्यशाळेचे उद्घाटन व प्रास्ताविक.

२) ईबुक्स: स्वरूप, प्रकार, वैशिष्ट्ये, प्रिंट बुक व ईबूक तुलना, आजच्या जागतिक बाजारपेठेतील ईबुक्सची स्थिती, ईबुक्सच्या भविष्यकाळातील स्वरूपाचा अंदाज.

३) किंडल ईबुक, तांत्रिक तपशील व किंडल निर्मितीचे प्रात्यक्षिक.

४) किंडलच्या जागतिक स्तरावरील विक्री व व्यवहाराचे स्वरूप

५) मराठी भाषेतील किंडल ईबुक आवृत्त्यांचे तंत्र आणि युनिकोड फॉन्टस.

६) प्रश्नोत्तरे

या कार्यशाळेतील सहभागासाठी केवळ रु. ३००/- शुल्क असून यामध्ये मध्यंतरातील आहाराचा समावेश आहे.

संपर्क: कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे (9881435680)