नमस्कार!
२७ फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सर्वांनी किमान एक मराठी पुस्तक विकत घेऊन आपल्या मित्र, नातेवाईक व्यक्तीला भेट म्हणून द्यावे, असा उपक्रम आपण राबवत आहोत.
या उपक्रमाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने आपल्या सर्व सभासदांच्या कार्यालयात, ग्रंथविक्री दालनांत, तसेच आपल्या ग्राहकांना, मित्रांना देण्यासाठी आपण पुढील प्रमाणे एक भित्तीपत्रक (पोस्टर) तयार केले आहे.
१८” X २३” या आकाराचे हे भित्तीपत्रक असून आपल्या सभासदांसाठी केवळ रु. २०/- मध्ये उपलब्ध आहे. (एक पोस्टर अर्थातच प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या कार्यालयात लावण्यासाठी मोफत देणार आहोत.) प्रत्येकाने या उपक्रमाच्या प्रसारार्थ किमान १० तरी भित्तीपत्रके घ्यावीत. (अर्थात हवी तेवढी मिळू शकतील.)
पुण्यातील प्रकाशकांनी प्रकाशक संघाच्या कार्यालयात रक्कम पाठवून सकाळी ११ ते ३ या वेळेत ती घेऊन जावीत. बाहेरगावच्या प्रकाशकांनी कृपया वीणा पेशवे यांचेशी (९८८१४३५६८०) संपर्क करावा.
२० फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत ही पोस्टर मिळू शकतील.
धन्यवाद!
– प्रमुख कार्यवाह