Press "Enter" to skip to content

आपले नाशिक संमेलन

आपल्या नाशिक संमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे. कार्यक्रम पत्रिका पुढे दिली आहे. दोन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. आपल्या सर्वांचे स्वागत करण्यास, आपण सर्वांना भेटण्यास आम्ही उत्सुक आहोत.

सहभाग नोंदणी चालू आहे. सर्व व्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही संमेलनातील सहभागाची नोंदणी येत्या रविवार दि. ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता थांबवत आहोत. तरी ज्या मंडळींनी अजून नोंदणी केली नसेल त्यांनी तातडीने करावी ही विनंती!

राजीव बर्वे

(अध्यक्ष- अ. भा. म. प्रकाशक संघ, पुणे)

विलास पोतदार

(अध्यक्ष- अ. भा. म. प्रकाशक संघ, नाशिक शाखा)

दोन दिवसाच्या या संमेलनातील सर्व कार्यक्रम, ३ भोजने (दि. ६ दुपार व रात्र, दि. ७ दुपार.), २ ब्रेकफास्ट (दि. ६ सकाळ व दि. ७ सकाळ) ३ चहापान व दिनांक ६ रोजीच्या निवासव्यवस्थेसह (ट्वीन शेअरिंग एसी रुम) रुपये २००० शुल्क केवळ! आपण खालील दोन ठिकाणांपैकी एका ठिकाणी हे शुल्क भरू शकता.

१) प्रकाशक संघाच्या खालील खात्यावर किंवा ९८५०९६२८०७ (पराग लोणकर) या जीपे क्रमांकावर शुल्क भरून.

प्रकाशक संघाच्या खात्याचा तपशील:-

खात्याचे नाव:- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.

बँक:- बँक ऑफ महाराष्ट्र,

शाखा:- शनिवार पेठ, पुणे.

बचत खाते क्र:- २०१३६९४२७३३

IFSC:- MAHB0000675

किंवा

२) ९८९०९३३७९० (श्री. विलास पोतदार) या जीपे क्रमांकावर शुल्क भरून.

दोन्ही पैकी कोणत्याही ठिकाणी शुल्क भरल्यावर कृपया ९८८१४ ३५६८० (सौ. वीणा पेशवे – कार्यालयीन कार्यवाह) या whatsapp क्रमांकावर न विसरता शुल्क भरल्याची व उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची नावे वैयक्तिक कळवावीत ही विनंती.