आपल्या संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके आता मागवित आहोत.
१) ललित, २) ललितेतर, ३) संदर्भ, ४) उपयुक्त व छंदविषयक, ५) विज्ञानविषयक, ६) शिशुसाहित्य, ७) बालसाहित्य, ८) कुमारसाहित्य, ९ अ) मुखपृष्ठ (प्रौढ विभाग), ९ ब) मुखपृष्ठ (बाल विभाग), १०) ग्रामीण आणि निमशहरी प्रकाशक, या विभागांबरोबरच ज्या प्रकाशकांनी वर्ष २०२२ मध्ये स्वत:च्या लेखनाची पुस्तके प्रकाशित केली असतील त्यांनी ११) `प्रकाशक-लेखक` पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठवावीत. १२) जाहिराती व ग्रंथ प्रचार साहित्यही आपण पाठवू शकता. अशा प्रकारे बारा विभागात पुरस्कार दिले जातात.
तरी प्रकाशकांनी आपल्या दि. १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची (पुरस्कार योजनेसाठी सप्रेम भेट वगैरे काहीही मजकूर अथवा शिक्का नसलेली) प्रत्येकी एक प्रत संघाच्या पुढील पत्त्यावर दि. २५ फेब्रुवारी २०२३ पूर्वी पाठवावी. पुस्तकांबरोबर (पाठवत असलेल्या) पुस्तकांची यादी जोडून वरीलपैकी कोणत्या विभागासाठी कोणते पुस्तक पाठवत आहोत याचा कृपया उल्लेख करावा. (आपण नमूद केलेल्या विभागापेक्षा वेगळ्या विभागात पुरस्कार देण्याचा परीक्षकांना अधिकार असेल.) परीक्षकांचा निकाल/निर्णय अंतिम राहील.
महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व पुरस्कार प्रकाशकांसाठी असून मुखपृष्ठासाठीचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार अशा दोघांनाही प्रदान केले जातील. केवळ प्रकाशकांसाठी असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव पुरस्कार आहेत.
पुरस्कारासाठी आलेली पुस्तके प्रकाशकांस परत पाठवली जात नाहीत. या पुस्तकांचा पुढील विनियोग (विक्री-देणगी-संग्रह) करण्याचे स्वातंत्र्य प्रकाशक संघाकडे असते.
पुरस्कारासाठी पात्र होण्यासाठी आपण प्रकाशक संघाचे सभासद असणे आवश्यक आहे. आपण चालू वर्षाची वर्गणी भरलेली नसल्यास कृपया आपल्या कार्यालयीन कार्यवाह (वीणा पेशवे- ९८८१४ ३५६८०) यांना संपर्क करावा.
स्पर्धेसाठी पुस्तकं पाठवण्याबाबत काहीही शंका असल्यास कृपया संघाचे प्रमुख कार्यवाह श्री. पराग लोणकर (९८५०९६२८०७) यांना संपर्क करावा.
आपली पुस्तकं २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ
२५१ क, शनिवार पेठ, मुठेश्वर चौक, पुणे-४११०३०.
दूरध्वनी: ०२०-२४४८३०३१, ९८८१४३५६८०.
धन्यवाद!
प्रमुख कार्यवाह