आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना निर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित दिवाळी अंक आपण यापूर्वीच मागवले आहेत. मात्र ग्रंथनिर्मिती पुरस्कारांसाठी पुस्तकं मागविण्याचे निवेदन प्रसूत केल्यावर काही दिवाळी अंक प्रकाशकांनी आपले अंक पाठवायचे राहिले असल्याने, ते अंक पाठवायची मुभा द्यावी अशी विनंती केली आहे. या प्रकाशकांना आपले अंक पाठवण्यासाठी आपण १५ फेब्रुवारी २०२३ पर्यन्त मुदत देत आहोत.
आपल्या प्रकाशक संघातर्फे विनोदी, ललित, बाल-कुमार, उपयुक्त व छंदविषयक, विशिष्ठ विषय व संकीर्ण अशा विभागांत दिवाळी अंकांना पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार उत्कृष्ट निर्मितीसाठी दिले जातात आणि ते अंकांच्या प्रकाशकांस दिले जातात. वरील विभागांबरोबरच स्पर्धेसाठी आलेल्या सर्व अंकांमधून उत्कृष्ट मुखपृष्ठांसाठी अंक निवडले जाऊन या अंकांच्या चित्रकार व प्रकाशकांना सन्मानित केले जाणार आहे. आपण या विभागासाठी खास नमूद करूनही आपला अंक पाठवू शकता.
तरी ज्या मंडळींनी अजून आपले २०२२ या वर्षी प्रकाशित झालेले दिवाळी अंक स्पर्धेसाठी पाठवले नसतील त्यांनी अंकाची एक प्रत आपल्या संघाच्या खालील पत्त्यावर पोस्ट/कुरीयरने अथवा समक्ष पाठवावी.
काही तांत्रिक अडचणींमुळे Digital अंक विभागात यापुढे पुरस्कार निवड न करण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला असल्याने या वर्षीपासून आपले डिजिटल/pdf दिवाळी अंक कृपया स्पर्धेसाठी मेल करू नयेत ही विनंती.
आपले छापील दिवाळी अंक पाठवण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२३
अंक पाठवण्यासाठी पत्ता:
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ
२५१ क, शनिवार पेठ, मुठेश्वर चौक, पुणे-४११०३०.
भ्रमणध्वनी – ९८८१४३५६८०
प्रमुख कार्यवाह