अ. भा. मराठी प्रकाशक संघ आयोजित
तीन कार्यशाळांच्या मालिकेतील
कार्यशाळा क्र. ३
विषय : ग्रंथ विक्री (छापील पुस्तकांची विक्री)
दिनांक : १० फेब्रुवारी २०२४ (शनिवार)
स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.
वेळ : सकाळचे सत्र
नमस्कार!
आपल्याला माहीतच आहे की प्रकाशक संघाच्या या आर्थिक वर्षात दोन कार्यशाळा संपन्न झाल्या असून त्यांना आपला सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दोनही कार्यशाळा सहभागी मंडळींसाठी माहितीपूर्ण व उपयुक्त ठरल्या आहेत.
आता तिसऱ्या कार्यशाळेची घोषणा करीत आहोत. आपली तिसरी कार्यशाळा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी असून ही कार्यशाळा आपल्या सर्वांच्याच दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. त्याचा विषय आहे : छापील पुस्तकांची विक्री.
१) शासकीय ग्रंथ खरेदी, ब्रँडींग आणि अॅडव्हरटायजिंग, पुस्तक विक्रीची माध्यमे, पुस्तक प्रदर्शने आणि विक्री अशा महत्वाच्या विषयांवर या कार्यशाळेत चर्चा, मार्गदर्शन केले जाणार आहे. या पुढील निवेदनात कार्यशाळेचा ‘मिनीट टू मिनिट’ कार्यक्रम आणि वक्ते यांची घोषणा केली जाईल.
२) कार्यशाळेत सहभागी होण्यासाठीची नोंदणी आजपासून सुरु करीत आहोत. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्रवेश नक्की केला जाईल. आसनक्षमता मर्यादित आहे. कार्यशाळा शुल्क केवळ रु. ३५०/- (चहा-नाश्त्यासह).
या कार्यशाळेत प्रकाशक संघाच्या सभासदांना आपल्या पुस्तकांचे जाहीर प्रकाशन करण्यासाठी खास वेळ राखून ठेवला जाणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीये. पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या मंडळींनी फक्त कार्यशाळा शुल्क भरणे आवश्यक असेल.
कार्यशाळा फक्त प्रकाशक संघाच्या सदस्यांसाठी असेल.
प्रकाशक संघाच्या खालील खात्यात किंवा क्यूआर कोड वर आपले कार्यशाळा सहभाग शुल्क रु. ३५०/- भरून संघाच्या कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे यांना (९८८१४३५६८० या क्रमांकावर) whatsapp मेसेजने कळवावे ही विनंती.
प्रकाशक संघाच्या खात्याचा तपशील:-
खात्याचे नाव:- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा:- शनिवार पेठ, पुणे.
बचत खाते क्र:- २०१३६९४२७३३
IFSC:- MAHB0000675
धन्यवाद!
– पराग लोणकर
(प्रमुख कार्यवाह)