Press "Enter" to skip to content

जीवनगौरव पुरस्कार, साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार

नमस्कार!

२३ एप्रिल, जागतिक पुस्तकदिनाचे आैचित्य साधून प्रकाशक संघ खास प्रकाशकांसाठी असलेले *उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार* व त्याचबरोबर अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाणारे *जीवनगौरव पुरस्कार* व *साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार* देत असतो. यावेळेस अर्थातच हे पुरस्कार आपल्याला पुढे ढकलावे लागले आहेत. तरी आजच्या दिनाचे अाैचित्य साधून आम्ह‍ाला येथे कळवण्यात आनंद वाटतो की या वर्षीच्या *जीवनगाैरव पुरस्कारासाठी* आपण *ज्येष्ठ प्रकाशक श्री. दिलीप माजगावकर (राजहंस प्रकाशन)* यांची, तर *साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती प्रतिभा रानडे* यांची निवड केलेली आहे.लवकरच सध्याचे हे संकट दूर होऊन आपल्याला अापल्या प्रकाशक बंधुंना आणि मान्यवरांना सन्मानित करण्याची संधी मिळो हीच प्रार्थना!*आपणा सर्वांना आजच्या या जागतिक ग्रंथदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 💐*-

प्रकाशक संघ कार्यकारिणी*