मा. मदाने यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना NBT मराठी विभागाला प्रकाशक संघाचा तत्पर मदतीचा हात वेळोवेळी उपलब्ध होत असल्याबद्दल काैतुक व्यक्त करत असतानाच मराठी भाषा व साहित्य आणि मराठी प्रकाशक यांना NBT आपल्या उपक्रमांसाठी जास्तीत जास्त सहकार्य करेल असे आश्वासन दिले. याप्रसंगी मा. मदाने यांनी जानेवारी महिन्यात दिल्ली येथे भरणार्या जागतिक पुस्तक मेळाव्यासाठी प्रकाशक संघाला औपचारिक निमंत्रण दिले.
या बैठकीस प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीबरोबरच प्रकाशक संघाचे ज्येष्ठ सल्लागार मा. श्री. अनिल मेहता, मा. श्री. शरद गोगटे व मा. श्री. अविनाश पंडित हेही उपस्थित होते.
पराग लोणकर
(प्रमुख कार्यवाह- अ.भा.म. प्रकाशक संघ)