Press "Enter" to skip to content

NBT चे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. श्री. मिलिंद मराठे यांच्याबरोबर काल झालेल्या बैठकीविषयी

काल बुधवार दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी NBT चे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. श्री. मिलिंद मराठे हे NBT तर्फे पुणे येथे येत्या नोव्हेंबर/डिसेंबर मध्ये प्रस्तावित असलेल्या पुणे पुस्तक महोत्सव (ग्रंथ जत्रा/प्रदर्शन) संबंधी आखणी व नियोजन या संदर्भातील बैठकीसाठी आले होते. या बैठकीस आपल्या प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीस आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीपूर्वी NBTचे अध्यक्ष झाल्याबद्दल आपण अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे त्यांचा सन्मान केला. प्रत्यक्ष बैठकीत या महोत्सवाच्या आयोजनाबाबत आपले मा. अध्यक्ष श्री. राजीव बर्वे यांनी प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते यांच्या दृष्टीने महत्वाच्या अनेक सूचना मा. अध्यक्षांपुढे मांडल्या. महोत्सवाची आखणी करताना या सर्व सूचना लक्षात घेतल्या जातील असे आश्वासन श्री. मराठे यांनी आपल्या भाषणात दिले. प्रकाशक संघातर्फे या बैठकीस प्रकाशक संघाचे मा. अध्यक्ष श्री. राजीव बर्वे, मा. उपाध्यक्ष श्री. दत्तात्रेय पाष्टे, श्री. सुकुमार बेरी, श्री. पराग लोणकर, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी व आपल्या कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे उपस्थित होते.

– प्रमुख कार्यवाह.