Press "Enter" to skip to content

अवैधरीत्या मराठी पुस्तकांच्या PDF प्रसाराबाबत अ. भा. म. प्रकाशक संघातर्फे सायबर सेलमध्ये तक्रार दाखल

शेकडो मराठी पुस्तकांच्या बेकायदेशीर PDF विविध mobile applications मध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कॉपीराईट कायद्यानुसार पूर्वपरवानगीशिवाय असे करणे गुन्हा आहे. यामुळे आपले मराठी प्रकाशक, मुद्रक, वितरक, लेखक यांपासून अगदी ग्रंथालयांपर्यंतच्या घटकांना मोठी आर्थिक झळ बसत आहे.

कोरोना आणि lockdown यामुळे आधीच खूप मोठा आर्थिक फटका बसलेला आहे.या पुस्तक पायरसीला आळा घालण्यात यावा यासाठी काल आपल्या प्रकाशक संघातर्फे श्री. दत्तात्रय पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली श्री. विशाल सोनी, श्री. नितीन गोगटे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी आणि श्री. मधुर बर्वे यांनी पोलिस कमिशनर ऑफिसमध्ये सायबर गुन्ह्यांची उकल करणाऱ्या उपायुक्तांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन ह्या सर्व प्रकारातील गुन्ह्याचे स्वरूप सविस्तर समजावून देऊन निवेदन दिले आहे.*मा. श्री. संभाजी कदम साहेब, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस- आर्थिक गुन्हे शाखा व सायबर क्राईम शाखा यांनी आपल्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून संघाच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केले की या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा योग्य तो छडा लावला जाईल व याबाबत योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल.*

या कोरोनाच्या काळातही बाहेर पडून ही महत्त्वाची बैठक केल्याबद्दल आपल्या संघाची वरील मंडळी निश्चित कौतुकास पात्र आहेत.आता अशी आशा करायला काहीच हरकत नसावी, की आपल्या या तक्रारीची योग्य ती दखल घेतली जाईल व साहित्य क्षेत्रावर या पायरसीमुळे आलेले संकट दूर होईल.*- प्रमुख कार्यवाह.*