Press "Enter" to skip to content

चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक श्री. अशोक कोठावळे यांची निवड

आपल्या दि. ६ मे व दि. ७ मे रोजीच्या चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक श्री. अशोक कोठावळे यांची निवड करण्यात आली आहे.

श्री. अशोक कोठावळे यांनी ‘मॅजेस्टिक’ प्रकाशनाचे संस्थापक दिवंगत केशवराव कोठावळे यांचा प्रकाशन व्यवसायाचा वारसा समर्थपणे पुढे नेऊन मुंबईबरोबरच पुण्यात ‘मॅजेस्टिक’चा विस्तार करताना ‘मॅजेस्टिक गप्पा’ या अभिनव उपक्रमाद्वारे लेखक आणि वाचक यांचे नाते अधिक दृढ केले. २००४ या वर्षी औरंगाबाद येथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात’ अशोक कोठावळे यांना ‘उत्कृष्ट प्रकाशका’चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोत्कृष्ट प्रकाशन संस्थेसाठीचा ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ २०१२ साली ‘मॅजेस्टिक’ला प्रदान करण्यात आला आहे. १९८३ सालापासून ‘दीपावली’ आणि ‘ललित’ या दोन्ही अतिशय दर्जेदार अंकांचे संपादक म्हणून अशोक कोठावळे काम पाहत आहेत.

असे हे व्यक्तिमत्व आपल्या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले आहे. श्री. अशोक कोठावळे यांचे आम्ही प्रकाशक संघातर्फे मनापासून अभिनंदन करत आहोत.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी