स.न.वि.वि.
काल सायंकाळी पत्रकार भवन येथील सभेत ज्येष्ठ लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष व माजी प्रशासनिक अधिकारी श्री. भारत सासणे, जे निवडणूक निर्णय अधिकारी होते, त्यांनी आपल्या प्रकाशक संघाच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. त्यापूर्वी श्री. सासणे यांच्याच उपस्थितीत नवीन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे:-
श्री. राजीव बर्वे – अध्यक्ष
श्री. दत्तात्रेय पाष्टे – उपाध्यक्ष
श्री. सुकुमार बेरी – कोषाध्यक्ष
श्री. पराग लोणकर – प्रमुख कार्यवाह
श्री. रमेश शेलार – कार्यवाह
श्री. रवींद्र बेहेरे – कार्यकारिणी सदस्य
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी – कार्यकारिणी सदस्य
श्री. संजय राजे – कार्यकारिणी सदस्य
श्री. युवराज माळी – कार्यकारिणी सदस्य
श्री. जयदीप कडू – कार्यकारिणी सदस्य
सौ. अमृता कुलकर्णी – कार्यकारिणी सदस्य
श्री. मधुर बर्वे – कार्यकारिणी सदस्य
श्री. किरण आचार्य – कार्यकारिणी सदस्य.
वरील कार्यकारिणी सदस्यांबरोबरच प्रकाशक संघाचे सल्लागार म्हणून मा. श्री. शरद गोगटे, मा. श्री. अनिल मेहता व मा. साै. शशिकला उपाध्ये यांची नवीन कार्यकारिणीकडून एकमताने निवड करण्यात आली.
प्रकाशक संघाच्या आपण सर्व सामान्य, सक्रिय व आजीव सभासदांच्या सहकार्याने, या पुढील पाच वर्षांत आपण साहित्य क्षेत्रासाठी अधिक जोमाने व अधिक भरीव काम करु असा विश्वास वाटतो.
प्रमुख कार्यवाह