आपल्या २ एप्रिल २०२३ रोजीच्या प्रकाशन व्यवसाय कार्यशाळेच्या नोंदणी संदर्भात!
आपल्या सर्वांना माहीतच आहे, की आपण तीन कार्यशाळा घेत आहोत. यातील पहिल्या कार्यशाळेसाठीची नोंदणी आपण आता चालू करीत आहोत.
कार्यशाळेचा वार व दिनांक: रविवार दि. २ एप्रिल २०२३
कार्यशाळेची वेळ : स. ९.३० ते दु. १.३०
स्थळ:- पत्रकार भवन- बी. व्ही. राव हॉल- नवी पेठ, पुणे.
विषय व मान्यवर वक्ते
१) पुस्तक निर्मिती प्रक्रिया व संपादन
वक्ते:-
मा. डॉ. सदानंद बोरसे (सुप्रसिद्ध संपादक व लेखक)
मा. डॉ. अंजली जोशी (सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका)
मा. डॉ. आशा भागवत (सुप्रसिद्ध संपादिका व हस्तलिखित समीक्षक)
मा. डॉ. मृणाल धोंगडे (सुप्रसिद्ध अनुवादिका)
२) प्रकाशन व्यवसायात आर्थिक गुंतवणूक आणि भांडवल उभारणी
वक्ते:-
मा. श्री. दत्तात्रय पाष्टे (डायमंड पब्लिकेशन्स)
मा. श्री. विशाल सोनी (विश्वकर्मा पब्लिकेशन्स)
मा. सुनिताराजे पवार (संस्कृती प्रकाशन)
मा. श्री. शेलार सर (युनियन बँक ऑफ इंडिया)
३) ग्रंथालय संचालनालयाच्या योजना :
माननीय ग्रंथालय संचालक श्री. दत्तात्रय क्षीरसागर यांची प्रकट मुलाखत. मुलाखतकार- मा. श्री. राजीव बर्वे (अध्यक्ष अ. भा. मराठी प्रकाशक संघ)
अत्यंत महत्वाचे
१) या कार्यशाळेसाठी प्रकाशक संघाने अतिशय नाममात्र शुल्क रु. ३००/- निश्चित केले आहे. यामध्ये सर्व तीनही सत्रे, चहापान व दुपारचे भोजन समाविष्ट असेल.
२) कार्यशाळेचा प्रत्येकाला उपयोग व्हावा तसेच अतिशय काळजीपूर्वक निवडलेल्या मान्यवर व्यक्त्यांशी प्रत्यक्ष चर्चा व्हावी या दृष्टीने केवळ ६० व्यक्तींना कार्यशाळेत प्रवेश देण्याचे आपण निश्चित केले आहे. त्यामुळे प्रथम नावनोंदणी करणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वाने नोंदणी होईल. ६० व्यक्तींची नोंदणी झाल्यानंतर नोंदणी बंद करण्यात येईल.
प्रकाशक संघाच्या पुढील खात्यात किंवा 9881435680 या क्रमांकावर जीपेने रु. ३००/- भरून संघाच्या कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे यांच्या याच whatsapp क्रमांकावर शुल्क भरल्याचे कळवून आपली नोंदणी निश्चित करावी ही विनंती.
प्रकाशक संघाच्या खात्याचा तपशील:-
खात्याचे नाव:- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा:- शनिवार पेठ, पुणे.
बचत खाते क्र:- २०१३६९४२७३३
IFSC:- MAHB0000675
आजपासून नोंदणी सुरू करीत आहोत. आपण व आपल्या कार्यालयातील जबाबदार व्यक्तीने अवश्य यावे.
– प्रमुख कार्यवाह