Press "Enter" to skip to content

प्रकाशन व्यवसाय कार्यशाळा

आपली कार्यशाळा पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

ज्येष्ठ लेखक व विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन कार्यशाळेस सुरुवात झाली. कार्यशाळेची सर्वच सत्रे अतिशय माहितीपूर्ण व उद्बोधक झाली. सर्वच माननीय वक्त्यांचे आपापल्या विषयातील प्रभुत्व अधोरेखित होणारे असे त्यांचे मार्गदर्शन होते.

माननीय ग्रंथालय संचालक श्री. दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखतही अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली व क्षीरसागर साहेबांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते व योजना व्यक्त केल्या.

प्रकाशक संघाच्या आपण सर्व सभासदांचा या कार्यशाळेतील उत्स्फूर्त प्रतिसादही फार महत्त्वाचा होता. साठ जागांची नोंदणी करायचे ठरवले असताना आपल्या प्रतिसादामुळे सभागृहाची क्षमता लक्षात घेऊन ७१ नोंदणी झाल्यावर नोंदणी थांबवण्यात आली.

पुढील दोन कार्यशाळांच्या आयोजनासाठीचा उत्साह वाढवेल अशी कार्यशाळा होती.

अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी.