प्रकाशन व्यवसायातील विविध घटकांवर मार्गदर्शन करणाऱ्या चर्चा, परिसंवाद घडवून आणणाऱ्या कार्यशाळा आपला अ. भा. मराठी प्रकाशक संघ नेहमीच आयोजित करतो, हे सर्वांनाच माहीत आहे.
लवकरच पुण्यात विविध विषयांवर तीन कार्यशाळांची मालिका आपण आयोजित करीत आहोत. या तीनही कार्यशाळा अर्ध दिवसीय असणार आहेत.
यापैकी आपली पहिली कार्यशाळा रविवार दि. २ एप्रिल २०२३ रोजी होणार असून, यामध्ये १) पुस्तक निर्मिती प्रक्रिया व संपादन २) प्रकाशन व्यवसायात आर्थिक गुंतवणूक आणि भांडवल उभारणी ३) ग्रंथालय संचालनालयाच्या योजना; या विषयांचा समावेश आहे.
दि. २ एप्रिल रोजीच्या कार्यशाळेचे आणखी एक विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपण माननीय ग्रंथालय संचालक श्री. दत्तात्रय क्षीरसागर यांची प्रकट मुलाखत घेणार आहोत.
सकाळच्या सत्रात ही कार्यशाळा होणार असून दुपारच्या भोजनाने कार्यक्रम समाप्ती होईल. यासाठी अतिशय नाममात्र शुल्क असेल.
दि. २ एप्रिल रोजीच्या कार्यशाळेचा सविस्तर कार्यक्रम, ठिकाण व वेळ लवकरच जाहीर करीत आहोत.
प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, या मंडळींकडील कर्मचारी वर्ग यांबरोबरच लेखक, संपादक अशा मंडळींसाठी देखील या कार्यशाळा उपयुक्त ठरतील असा विश्वास वाटतो.
प्रकाशक संघातर्फे यापूर्वी घेतलेल्या कार्यशाळांप्रमाणे या कार्यशाळा देखील माहितीपूर्ण, मार्गदर्शक आणि सर्वांना एकत्र येण्याची संधी देणाऱ्या असणार आहेत. तूर्त रविवार २ एप्रिल २०२३ ही तारीख राखून ठेवण्यासाठी हा संदेश पाठवला आहे.
– पराग र. लोणकर
(प्रमुख कार्यवाह)