विषय : ईबुक आणि किंडल आवृत्ती : तंत्र, मंत्र आणि व्यवसायातील संधी.
दिनांक : १ ऑक्टोबर २०२३ (रविवार).
स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.
वेळ : सकाळचे सत्र
मार्गदर्शक : माधव शिरवळकर (तंत्रज्ञान विषयक पुस्तकांचे लेखक आणि माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक.)
नमस्कार!
आपल्याला माहीतच आहे की प्रकाशक संघाची या वर्षातील पहिली कार्यशाळा २ एप्रिल रोजी संपन्न झाली होती. त्या कार्यशाळेला इतका उदंड प्रतिसाद मिळाला होता की सभागृहाची क्षमता लक्षात घेऊन शेवटी नोंदणी थांबवावी लागली होती.
पहिल्या कार्यशाळेच्या त्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर, उपरोल्लेखित दुसऱ्या कार्यशाळेच्या १ ऑक्टोबर या तारखेची फक्त घोषणा या निवेदनात करत आहोत. प्रत्यक्ष नोंदणी चालू करण्याचे वेळी सहभाग शुल्क वगैरे तपशीलासह पुन्हा निवेदन दिले जाईलच. तूर्तास, या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी १ ऑक्टोबर २०२३ ही तारीख राखून ठेवावी ही विनंती.
कार्यशाळेचा थोडक्यात तपशील
ईबुक आणि पुस्तकाची किंडल आवृत्ती हा आपल्या प्रकाशन व्यवसायाचा उपयुक्त भाग आहे. गेल्या काही वर्षांत ईबुक्सच्या व्यावसायिक जगात नवनवी तंत्र आली आहेत. खेरीज भारताबरोबर जगातील आशिया, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया खंडांतील विविध देशांमध्ये आपल्या मराठी पुस्तकांच्या किंडल आवृत्तीसाठी ई कॉमर्स स्वरूपाची मोठी जागतिक बाजारपेठ आज ॲमेझॉनसारख्या संस्थांनी खुली केली आहे. ईबुक किंवा किंडल निर्मितीचे तंत्रज्ञान विषयक प्रात्यक्षिक तसेच जागतिक बाजारपेठेत त्या आवृत्तीची डॉलर्स, पौंड आणि येन सारख्या चलनांतून प्रत्यक्ष विक्री यांची अमूल्य आणि अद्ययावत माहिती तसेच महत्वाच्या टीप्स आणि ट्रीक्स या विषयातील तज्ज्ञ श्री. माधव शिरवळकर हे आपल्यापुढे सादर करणार आहेत. थोडक्यात, “ईबुक्स आणि किंडलच्या इतिहासापासून ते तंत्रज्ञान, निर्मितीच्या व विक्रीच्या पद्धतीपर्यंतचा’ परिचय” हा या कार्यशाळेचा विषय आहे. प्रश्नोत्तरे आणि शंकासमाधान यासाठी कार्यशाळेच्या अखेरच्या सत्रात काही वेळ राखून ठेवण्यात आला आहे.
मार्गदर्शक श्री. माधव शिरवळकर यांचा सविस्तर परिचय http://sanganak.in/bio या लिंक वर उपलब्ध आहे.
धन्यवाद!
– प्रमुख कार्यवाह.