Press "Enter" to skip to content

उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०२३ निकाल

नमस्कार!

वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांतील पुढील अंकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली आहेत. सर्व पुरस्कार दिवाळी अंकांच्या प्रकाशकांना दिले जातात व मुखपृष्ठासाठीचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार या दोघांना दिले जातात.

सर्व पुरस्कार विजेत्या दिवाळी अंक प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

(विभाग – अंकाचे नाव – प्रकाशनाचे नाव)

विनोदी प्रथम – आवाज – भारतभूषण पाटकर, मुंबई

विनोदी द्वितीय – जत्रा – मेनका प्रकाशन, पुणे

विनोदी उत्तेजनार्थ – हास्य धमाल – कलाकुंज प्रकाशन, नाशिक

ललित प्रथम – शब्दमल्हार – शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक

ललित द्वितीय – सकाळ साप्ताहिक – सकाळ मीडिया प्रा. लि. पुणे

ललित उत्तेजनार्थ – गुंफण – डॉ. बसवेश्वर चेणगे, सातारा

विशिष्ट विषय प्रथम – सकाळ – ‘मनी’ – सकाळ मीडिया प्रा. लि. पुणे

विशिष्ट विषय द्वितीय – वेदान्तश्री: – वेदान्तश्री: प्रकाशन, पुणे

विशिष्ट विषय उत्तेजनार्थ – ज्येष्ठविश्व – व्यास क्रिएशन्स्, ठाणे

उपयुक्त व छंदविषयक प्रथम – ‘मी’ (पाणी विशेषांक) – दिनमार्क पब्लिकेशन्स, पुणे

उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – पासबुक आनंदाचे – व्यास क्रिएशन्स्, ठाणे

उपयुक्त व छंदविषयक उत्तेजनार्थ – प्रसाद – प्रसाद प्रकाशन, पुणे

बालकुमार प्रथम – मनशक्ती बालकुमार – मनशक्ती, लोणावळा

बालकुमार द्वितीय – छावा – केसरी-मराठा ट्रस्ट, पुणे

बालकुमार उत्तेजनार्थ – निर्मळ रानवारा – वंचित विकास, पुणे

संकीर्ण प्रथम – समतोल – स्त्री शक्ती प्रबोधन, पुणे

संकीर्ण द्वितीय – चांगुलपणाची चळवळ – डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन

संकीर्ण उत्तेजनार्थ – साहित्य सावाना – सार्वजनिक वाचनालय, नाशिक

मुखपृष्ठ प्रथम – गंधाली – सौ. कुमुद मधुकर वर्तक, मुंबई / चित्रकार- मनोज आचार्य

मुखपृष्ठ द्वितीय – मुक्तपर्व – दै. उद्याचा मराठवाडा, नांदेड / चित्रकार- विवेक रानडे, नागपूर

मुखपृष्ठ उत्तेजनार्थ – शुभम – प्रिय प्रकाशन, पुणे / चित्रकार – वर्षा खरटमल.

सर्व पुरस्कार प्राप्त प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

आपल्या नाशिक येथील चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात रविवार दि. ७ मे रोजी सकाळी १० वाजता मा. श्री. उज्ज्वल निकम, मा. श्री. अशोक कोठावळे, मा. श्री. रामदास भटकळ व मा. श्री. प्रवीण दवणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.आपण सर्व प्रकाशक व मुखपृष्ठ विभागात पुरस्कार मिळालेल्या चित्रकारांनी समक्ष उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावेत ही विनंती.

अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी