Press "Enter" to skip to content

प्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२३

नमस्कार!

वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! हे सर्व पुरस्कार प्रकाशकांसाठी असून मुखपृष्ठांचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार असे दोघांनाही दिले जातात.

सर्व पुरस्कारप्राप्त प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

(विभाग – पुस्तकाचे नाव – प्रकाशनाचे नाव)

ललित प्रथम – माझं क्षितिज – डिंपल पब्लिकेशन, मुंबई

ललित द्वितीय – जपान – उद्वेली बुक्स, ठाणे

ललित उत्तेजनार्थ – खडकपालवी – साकेत प्रकाशन, औरंगाबाद

ललितेतर प्रथम – द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल – राजहंस प्रकाशन, पुणे

ललितेतर द्वितीय – दुस्तर अफगाणिस्तान – इंकिंग इनोव्हेशन्स, मुंबई

ललितेतर उत्तेजनार्थ – स्टीव्ह जॉब्ज – वैशाली प्रकाशन, पुणे

संदर्भ ग्रंथ प्रथम – पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे – राजेंद्र प्रकाशन, मुंबई

संदर्भ ग्रंथ द्वितीय – काव्यप्रदेशातील स्त्री – अथर्व पब्लिकेशन, जळगाव

संदर्भ ग्रंथ उत्तेजनार्थ – मध्ययुगीन मराठी वाङ्मय – कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

उपयुक्त व छंदविषयक प्रथम – आरोग्याचे संविधान – वनराई प्रकाशन, पुणे

उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – डॉक्टर, मला बाळ होईल का? – वैशाली प्रकाशन, पुणे

उपयुक्त व छंदविषयक उत्तेजनार्थ – शिकवण्यासाठी शिकू या! – सुरेश एजन्सी, पुणे

विज्ञानविषयक प्रथम – जग बदलणार्‍या मनाच्या प्रयोगशील कथा – अभिजित प्रकाशन, पुणे

विज्ञानविषयक उत्तेजनार्थ – जाणता हृदय हे… – शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक

शिशुसाहित्य प्रथम – वाघोबाचा पत्ता – राजहंस प्रकाशन, पुणे

बालसाहित्य प्रथम – अजब डोंगर – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

बालसाहित्य उत्तेजनार्थ – फुगा – रोहन प्रकाशन, पुणे

कुमारसाहित्य प्रथम – चंद्र, चंद्र आणि चंद्रच – दिलीपराज प्रकाशन, पुणे

कुमारसाहित्य उत्तेजनार्थ – अक्कलकाढा – नीहारा प्रकाशन, पुणे

मुखपृष्ठ (प्रौढ) प्रथम – काजवा – मनोविकास प्रकाशन/अन्वर हुसेन

मुखपृष्ठ (प्रौढ) द्वितीय – सुवर्णपर्वताच्या पल्याड आणि इतर एकांक – वर्णमुद्रा पब्लिशर्स/सतीश भावसार

मुखपृष्ठ (प्रौढ) उत्तेजनार्थ – कवितेच्या पारंब्या – संवेदना प्रकाशन/संतोष घोंगडे

मुखपृष्ठ (बाल) प्रथम – खळाळता अवखळ झरा – मेहता पब्लिशिंग/फाल्गुन ग्राफीक्स

मुखपृष्ठ (बाल) द्वितीय – चिंटूची स्वप्ननगरी – यशोदिप/प्रदीप खेतमर, पुणे

मुखपृष्ठ (बाल) उत्तेजनार्थ – राजाचा घोडा – मेहता पब्लिशिंग/साहिल उपळेकर

प्रकाशक-लेखक (प्रौढ) प्रथम – तिचं काय चुकलं? – मेधा पब्लिशिंग हाऊस/संजय महल्ले

प्रकाशक-लेखक (प्रौढ) उत्तेजनार्थ – मनभावन – जे. के. मीडिया/ज्योती कपिले

जाहिराती व ग्रंथप्रचार साहित्य प्रथम – कविता सागर प्रकाशन डायरी – कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर

जाहिराती व ग्रंथप्रचार साहित्य उत्तेजनार्थ – प्रकाशन सूची – इंकिंग इनोव्हेशन्स

ग्रामीण व निमशहरी प्रथम – युद्धरत – वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव

ग्रामीण व निमशहरी द्वितीय – परस्पर नात्यांचे वर्तुळ – गुरुप्रज्ञा प्रकाशन, बदलापूर

ग्रामीण व निमशहरी उत्तेजनार्थ – कबीर एक दार्शनिक ग्रंथ – कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर

सर्व पुरस्कार प्राप्त प्रकाशकांचे पुन:श्च मन:पूर्वक अभिनंदन!

आपल्या नाशिक येथील चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात रविवार दि. ७ मे रोजी सकाळी १० वाजता मा. श्री. उज्ज्वल निकम, मा. श्री. अशोक कोठावळे, मा. श्री. रामदास भटकळ व मा. श्री. प्रवीण दवणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. आपण सर्व प्रकाशक व मुखपृष्ठ विभागात पुरस्कार मिळालेले चित्रकार यांनी समक्ष उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावे ही विनंती.

– अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी