Press "Enter" to skip to content

बाल साहित्य लेखन कार्यशाळा!

२२ ते २५ मे २०२५ दरम्यान पुण्यातील गणेश कलाक्रीडा केंद्र येथे NBT, पुणे महानगर पालिका, पुणे पुस्तक महोत्सव आणि ‘संवाद, पुणे’ यांच्यातर्फे ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ हा बालमहोत्सव आयोजित केला आहे.

या महोत्सवात अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध बालसाहित्यिक श्री. राजीव तांबे यांची लेखन कौशल्य कार्यशाळा २४ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे.

बाल कुमार साहित्य लेखनात रुची असलेल्या सर्व वयोगटांतील व्यक्तींना कार्यशाळा खुली असून, उत्कृष्ट लेखनासाठी मार्गदर्शन व टिप्स यामध्ये दिल्या जातील.

ही कार्यशाळा नि:शुल्क असून, पूर्वनोंदणी मात्र आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश असून जागा पूर्ण होताच नोंदणी थांबवली जाईल. तरी इच्छुकांनी नावनोंदणीसाठी पुढील क्रमांकावर त्वरित संपर्क (WhatsApp) साधावा.

वीणा पेशवे : ९८८१४३५६८०

मधुर बर्वे : ९७६४००१४०३

कार्यशाळेत वैयक्तिक संवादावर भर असणार आहे. सहभागासाठी मर्यादित जागा आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.