प्रकाशक संघाच्या कार्यकारी मंडळाची माहिती
१९९६ च्या विजयादशमीच्या दिवशी स्थापन झालेल्या कार्यकारी मंडळाची माहिती पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – शरद गोगटे, उपाध्यक्ष – सुनील अंबिके, कार्यवाहक – विश्वास दास्ताने, कार्याध्यक्ष – राजीव बर्वे, कोषाध्यक्ष – सुनील मेहता, सदस्य – प्राची चिकटे, प्रदीप मुळे, कृष्णकुमार ठोकळ, वसंत पिंपळापुरे, संजय भगत, ना.स. देशपांडे, मिलिंद परांजपे, शशिकला उपाध्ये.
अ.भा.म.प्रकाशक संघाच्या स्थापनेपासून २००५ पर्यंत अध्यक्षपदी शरद गोगटे, २००५ ते २०१२ पर्यंत अध्यक्षपदी विश्वास दास्ताने व २०१२ ते २०१५ पर्यंत अध्यक्षपदी शशिकला उपाध्ये यांनी अध्यक्षपदाची सूत्रे यशस्वीपणे संभाळली. अ.भा.म.प्रकाशक संघाचे विद्यमान अध्यक्ष राजीव बर्वे आहेत.
वार्षिक सर्वसाधारण सभा व पंचवार्षिक निवडणूक
२९ सप्टेंबर २०१७ रोजी ‘भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात’ वार्षिक सर्वसाधारण सभा व पंचवार्षिक निवडणूक झाली. निवडणूक अधिकारी मा. भारत ससाणे या वेळी उपस्थित होते. निवडणूक बिनविरोधी झाली व पहिली कार्यकारणी पुन्हा निवडून आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या सभेस पुण्यातील व परगावाहून, मराठी प्रकाशक बहुसंख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष – राजीव बर्वे, उपाध्यक्ष – दत्तात्रय पाष्टे, प्रमुख कार्यवाह – पराग लोणकर, कार्यवाह – रमेश शेलार, कोषाध्यक्ष – सुकुमार बेरी, सदस्य – शशिकला उपाध्ये,रवींद्र बेहेरे, डॉ.स्नेहसुधा कुलकर्णी, नितीन गोगटे, मकरंद कुलकर्णी, संजय राजे, युवराज माळी, जयदीप कडू, विशाल सोनी
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर!
१८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी पत्रकार भवन येथील सभेत ज्येष्ठ लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष व माजी प्रशासनिक अधिकारी श्री. भारत सासणे, जे निवडणूक निर्णय अधिकारी होते, त्यांनी आपल्या प्रकाशक संघाच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. त्यापूर्वी श्री. सासणे यांच्याच उपस्थितीत नवीन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.
अध्यक्ष – श्री. राजीव बर्वे
उपाध्यक्ष – श्री. दत्तात्रेय पाष्टे
कोषाध्यक्ष – श्री. सुकुमार बेरी
प्रमुख कार्यवाह – श्री. पराग लोणकर
कार्यवाह – श्री. रमेश शेलार
कार्यकारिणी सदस्य – श्री. रवींद्र बेहेरे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, श्री. संजय राजे, श्री. युवराज माळी, श्री. जयदीप कडू, सौ. अमृता कुलकर्णी, श्री. मधुर बर्वे, श्री. किरण आचार्य
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे सल्लागार
मा. श्री. शरद गोगटे
मा. श्री. अनिल मेहता
मा. साै. शशिकला उपाध्ये