नमस्कार!
वर्ष २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांची सन्माननीय परीक्षकांनी- पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! हे सर्व पुरस्कार प्रकाशकांसाठी असून मुखपृष्ठांचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार असे दोघांनाही दिले जातात.
सर्व पुरस्कारप्राप्त प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!
(विभाग – पुस्तकाचे नाव – प्रकाशनाचे नाव)
ललित प्रथम – असो! – ग्रंथाली, मुंबई
ललित द्वितीय – कर्णपुत्र आणि अस्त्र – मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे
ललित उत्तेजनार्थ – शिवचरित्र – साकेत प्रकाशन प्रा. लि., छ. संभाजीनगर
ललितेतर प्रथम – कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन – सकाळ प्रकाशन, पुणे
ललितेतर द्वितीय – उजेडाच्या वाटा – चपराक प्रकाशन, पुणे
ललितेतर उत्तेजनार्थ – काव्यभान – अष्टगंध प्रकाशन, मीरा रोड
संदर्भ ग्रंथ प्रथम – बृहत् गीता शास्त्र खंड १ व २ – सकाळ प्रकाशन, पुणे
संदर्भ ग्रंथ द्वितीय – ग्लोबल साहित्य सफर भाग १ व २ – ग्रंथाली, पुणे
संदर्भ ग्रंथ उत्तेजनार्थ – बोध मनाच्या श्लोकांचा – वरदा प्रकाशन प्रा. लि., पुणे
उपयुक्त व छंदविषयक प्रथम – भारतीय ज्ञानपरंपरा – दिलीपराज प्रकाशन, प्रा. लि., पुणे
उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – चौदा विद्या चौसष्ट कला – परिस पब्लिकेशन, सासवड
उपयुक्त व छंदविषयक उत्तेजनार्थ – आई होताना… – साकेत प्रकाशन प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर
विज्ञानविषयक प्रथम – खगोलशास्त्रातील नोबेल पारितोषिके – दिलीपराज प्रकाशन, प्रा. लि., पुणे
विज्ञानविषयक उत्तेजनार्थ – सायबर गुन्हेगारी आणि स्व-संरक्षण – मिहाना पब्लिकेशन्स, पुणे
शिशुसाहित्य प्रथम – तुरा आणि मोरपिसारा – चेतक बुक्स, पुणे
शिशुसाहित्य उत्तेजनार्थ – शब्द शिंपले – ओंजळ प्रकाशन, पुणे
बालसाहित्य प्रथम – खरी श्रीमंती – सुरेश एजन्सी, पुणे
बालसाहित्य उत्तेजनार्थ – घरभर दरवळणारा सुगंध – सकाळ प्रकाशन, पुणे
कुमार साहित्य : प्रथम : मुलांसाठी आवडत्या गोष्टी – नावीन्य प्रकाशन, पुणे
कुमार साहित्य : उत्तेजनार्थ : चरित्र स्मरण – लाडोबा प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ (प्रौढ) प्रथम – मोझार्टचे रेक्वियम – वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव / चित्रकार: चंद्रमोहन कुलकर्णी
मुखपृष्ठ (प्रौढ) द्वितीय – बालशिक्षण- एक अद्भुत सफर – ग्रंथाली, मुंबई / चित्रकार: नीलिमा कढे
मुखपृष्ठ (प्रौढ) उत्तेजनार्थ – पाकिस्तान का मतलब क्या? – राजहंस प्रकाशन, पुणे / चित्रकार: बी. जी. लिमये
मुखपृष्ठ (बाल) प्रथम – हत्तीदादा – लाडोबा प्रकाशन, पुणे / चित्रकार: ज्योती घनश्याम
मुखपृष्ठ (बाल) द्वितीय – सोनूची डॅशिंग गोष्ट – दिलीपराज प्रकाशन, प्रा. लि. पुणे / चित्रकार: ओंकार महामुनी
मुखपृष्ठ (बाल) उत्तेजनार्थ – मस्त मजेत राहू – सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा / चित्रकार: संतुक गोलेगावकर
प्रकाशक-लेखक (प्रौढ) प्रथम – छंदी फंदी – रजत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
प्रकाशक-लेखक (प्रौढ) उत्तेजनार्थ – म्युचुअल फंड – सुभाषित प्रकाशन, नाशिक
प्रकाशक-लेखक (बाल) प्रथम – खगोलशास्त्रातील जयंत तारा! – नीहारा प्रकाशन, पुणे
प्रकाशक-लेखक (बाल) उत्तेजनार्थ – तुजी यत्ता कंची? – श्री. केदार साखरदांडे, विलेपार्ले
जाहिराती व ग्रंथप्रचार साहित्य प्रथम – साकेत ग्रंथसूची – साकेत प्रकाशन प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर
जाहिराती व ग्रंथप्रचार साहित्य उत्तेजनार्थ – शब्दालय ग्रंथसूची – शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
ग्रामीण व निमशहरी प्रथम – शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता.. आणि बरंच काही – अथर्वकुणाल प्रकाशन, सातारा
ग्रामीण व निमशहरी द्वितीय – क्रिम पोस्टिंग – परिस पब्लिकेशन, सासवड
ग्रामीण व निमशहरी उत्तेजनार्थ – दी कौन्सिलर्स लाइफ – गुरुप्रज्ञा प्रकाशन, बदलापूर
अनुवाद (मराठीत) प्रथम – मौलिक आंबेडकर – पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
अनुवाद (मराठीत) उत्तेजनार्थ – टाटा – न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
अनुवाद (इतर भाषांत) प्रथम – साये में धूप – श्रीविद्या प्रकाशन, पुणे
अनुवाद (इतर भाषांत) उत्तेजनार्थ – Self-Care Smilebook – मधुश्री प्रकाशन, पुणे
Ebook प्रथम – AIचा बटवा – लाइफ मंत्र पब्लिकेशन्स, कोल्हापूर
यावर्षीच्या मान्यवर परीक्षकांमध्ये लेखक व समीक्षक डॉ. संदीप सांगळे, चित्रकार श्री. संदीप देशपांडे आणि मुद्रक श्री. कुमार बोत्रे यांचा समावेश होता.
सर्व पुरस्कारविजेत्या प्रकाशकांचे पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन!
हे पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम शनिवार दि. ३० मे रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे येथे सं. ५.४५ ते ८ या वेळात संपन्न होणार आहे. लवकरच याबाबत सविस्तर तपशील जाहीर केला जाईलच.
अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी