Press "Enter" to skip to content

अ. भा. म. प्रकाशक संघाचे प्रकाशकांसाठीचे उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२६

नमस्कार!

वर्ष २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांतील पुढील अंकांची माननीय परीक्षकांनी- पुरस्कारांसाठी निवड केलेली आहे. सर्व पुरस्कार दिवाळी अंकांच्या प्रकाशकांना दिले जातात व मुखपृष्ठासाठीचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार या दोघांना दिले जातात.

सर्व पुरस्कार विजेत्या प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

(विभाग – अंकाचे नाव – प्रकाशनाचे नाव)

विनोदी प्रथम – आवाज – आवाज प्रकाशन, बोरिवली

विनोदी द्वितीय – सुभाषित – सुभाष सबनीस, नाशिक

विनोदी उत्तेजनार्थ – ऑल दी बेस्ट – उद्वेली बुक्स, ठाणे

ललित प्रथम – शब्दशिवार – शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा

ललित द्वितीय – अक्षरधारा – श्री. रमेश राठिवडेकर, पुणे

ललित उत्तेजनार्थ – लोकमंगल मैत्र – मैत्र प्रकाशन, सोलापूर

विशिष्ट विषय प्रथम – समदा – समदा क्रिएशन, पुणे

विशिष्ट विषय द्वितीय – उद्याचा मराठवाडा – दै. उद्याचा मराठवाडा, नांदेड

विशिष्ट विषय उत्तेजनार्थ – गावगाथा – श्री. धोंडपा नंदे, सोलापूर

उपयुक्त व छंदविषयक प्रथम – चांगुलपणाची चळवळ – डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन

उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – नृत्यावकाश – पदन्यास प्रकाशन, पुणे

उपयुक्त व छंदविषयक उत्तेजनार्थ – दुर्गांच्या देशातून… – दुर्गभान प्रकाशन, पुणे

बालकुमार प्रथम – मुलांचे मासिक – श्री. जयंत मोडक, नागपूर

संकीर्ण प्रथम – साहित्य सावाना – सार्वजनिक वाचनालय, नाशिक

संकीर्ण द्वितीय – ज्ञानपथ – ज्ञानपथ पब्लिकेशन, अमरावती

संकीर्ण उत्तेजनार्थ – आपला परम मित्र – परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे

मुखपृष्ठ प्रथम – अक्षरधारा – श्री. रमेश राठिवडेकर, पुणे / चित्रकार- श्री. अन्वर हुसेन

मुखपृष्ठ द्वितीय – परंतु (कस्तुरबा गांधी विशेषांक) – हर्मिस प्रकाशन, पुणे / चित्रकार- श्री. गिरीश सहस्त्रबुद्धे

मुखपृष्ठ उत्तेजनार्थ – ज्ञानपथ – ज्ञानपथ पब्लिकेशन, अमरावती / चित्रकार- ग्राफिटी आर्ट

यावर्षीच्या मान्यवर परीक्षकांमध्ये लेखक व समीक्षक डॉ. संदीप सांगळे, चित्रकार श्री. संदीप देशपांडे आणि मुद्रक श्री. कुमार बोत्रे यांचा समावेश होता.

सर्व पुरस्कारविजेत्या प्रकाशकांचे पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन!

हे सर्व पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम शनिवार दि. ३० मे रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे येथे सं. ५.३० ते ८ या वेळात संपन्न होणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नियोजन झाल्यावर त्याबाबत सविस्तर तपशील जाहीर केला जाईलच.

अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी