Press "Enter" to skip to content

अ. भा. म. प्र. संघाचे प्रकाशकांसाठीचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२५ जाहीर

नमस्कार!

वर्ष २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांची सन्माननीय परीक्षकांनी- पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! हे सर्व पुरस्कार प्रकाशकांसाठी असून मुखपृष्ठांचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार असे दोघांनाही दिले जातात.

सर्व पुरस्कारप्राप्त प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

(विभाग – पुस्तकाचे नाव – प्रकाशनाचे नाव)

ललित प्रथम – उद्ध्वस्त वर्तमानाच्या दाहीदिशा – शब्दालय पब्लिकेशन हाऊस, श्रीरामपूर

ललित द्वितीय – अपराजिता – मिहाना पब्लिकेशन्स, पुणे

ललित उत्तेजनार्थ – सो कुल.. टेक २ – राजहंस प्रकाशन, पुणे

ललितेतर प्रथम – स्वरस्वामिनी आशा – डिंपल पब्लिकेशन, मुंबई

ललितेतर द्वितीय – वसंत आबाजी डहाके (समग्र आकलन) – वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव

ललितेतर उत्तेजनार्थ १ – तडा – रोहन प्रकाशन, पुणे

ललितेतर उत्तेजनार्थ २ – इनुची गोष्ट – न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे

संदर्भ ग्रंथ प्रथम – वस्त्रगाथा – राजहंस प्रकाशन, पुणे

संदर्भ ग्रंथ द्वितीय – प्राचीन भारतीय खगोलविज्ञान – सकाळ मीडिया प्रा. लि. पुणे

संदर्भ ग्रंथ उत्तेजनार्थ – दापूर ते दिल्ली – जेके मीडिया, ठाणे

उपयुक्त व छंदविषयक प्रथम – फिल्मी कट्टा – सुरेश एजन्सी, पुणे

उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – ब्रॅंडनामा २.० – दिलीपराज प्रकाशन, प्रा. लि. पुणे

उपयुक्त व छंदविषयक उत्तेजनार्थ १ – वैदर्भीय खाद्यसंस्कृती – सकाळ मीडिया प्रा. लि. पुणे

उपयुक्त व छंदविषयक उत्तेजनार्थ २ – महाभारत ते भारत @ २०२५ – हेड्विग मीडिया हाऊस, मुंबई

विज्ञानविषयक प्रथम – इन्फोटेक – बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे

विज्ञानविषयक उत्तेजनार्थ – कथा जैवविविधतेची – सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे

शिशुसाहित्य प्रथम – विठू विठू विठोबा – दिलीपराज प्रकाशन, प्रा. लि. पुणे

शिशुसाहित्य उत्तेजनार्थ – फडताळातली खेळणी – संवेदना प्रकाशन, पुणे

बालसाहित्य प्रथम – छोट्यांसाठी गाणी आणि गोष्टी – गोबिझ मीडिया अँड मल्टीसर्विसेस

बालसाहित्य उत्तेजनार्थ – तलजू व इतर बालनाट्ये – पंडित पब्लिकेशन्स, कणकवली

कुमार साहित्य : प्रथम : अजब खजिना निसर्गाचा – रोहन प्रकाशन, पुणे

कुमार साहित्य : उत्तेजनार्थ : छोट्यांच्या मोठ्या गोष्टी – मांजरा प्रकाशन, लातूर.

मुखपृष्ठ (प्रौढ) प्रथम – राक्षस आणि पोपटाची अॅडल्ट कथा – रोहन प्रकाशन, पुणे / चित्रकार: चंद्रमोहन कुलकर्णी

मुखपृष्ठ (प्रौढ) द्वितीय – वर्जितमध्य – सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे / चित्रकार: अन्वर हुसेन

मुखपृष्ठ (प्रौढ) उत्तेजनार्थ – भटकन – जेके मीडिया, ठाणे / चित्रकार: सरदार जाधव

मुखपृष्ठ (बाल) प्रथम – अजब खजिना निसर्गाचा – रोहन प्रकाशन, पुणे / चित्रकार: अन्वर हुसेन

प्रकाशक-लेखक (प्रौढ) प्रथम – आख्यान – सुरेश एजन्सी, पुणे

प्रकाशक-लेखक (प्रौढ) उत्तेजनार्थ – क्वेश्चन मार्क – सहित प्रकाशन, गोवा

ग्रामीण व निमशहरी प्रथम – गळ्यावरचा निळा डाग – वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव

ग्रामीण व निमशहरी द्वितीय – जमाखर्च आयुष्याचा – इसाप प्रकाशन, नांदेड

ग्रामीण व निमशहरी उत्तेजनार्थ – वर्तुळ भाग-३ – गुरुप्रज्ञा प्रकाशन, बदलापूर

अनुवाद (मराठीत) प्रथम – जागतिक नोबेल कवी – मिहाना पब्लिकेशन्स, पुणे

अनुवाद (मराठीत) उत्तेजनार्थ – गंगालहरी – प्रसाद प्रकाशन, पुणे

अनुवाद (इतर भाषांत) प्रथम – Hambirrao Mohite – वरदा प्रकाशन, प्रा. लि. पुणे

अनुवाद (इतर भाषांत) उत्तेजनार्थ – Amazing America – ज्ञानपथ पब्लिकेशन, अमरावती

Ebook प्रथम – टेरेस गार्डन – सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा

Ebook उत्तेजनार्थ – स्वरभास्कर पं. भीमसेनजी जोशी – ई साहित्य प्रतिष्ठान

यावर्षीच्या मान्यवर परीक्षकांमध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या भारतासहित विविध देशांत अतिशय यशस्वी ठरलेल्या उपक्रमाचे संस्थापक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकचे श्री. विनायक रानडे, सुप्रसिद्ध चित्रकार वसुधा कुलकर्णी आणि नामवंत मुद्रक श्री. नंदप्रसाद बर्वे यांचा समावेश होता.

सर्व पुरस्कारविजेत्या प्रकाशकांचे पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन!

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नियोजन झाल्यावर त्याबाबत तपशील जाहीर केला जाईल.

अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी