नमस्कार!
वर्ष २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांतील पुढील अंकांची माननीय परीक्षकांनी- पुरस्कारांसाठी निवड केलेली आहे. सर्व पुरस्कार दिवाळी अंकांच्या प्रकाशकांना दिले जातात व मुखपृष्ठासाठीचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार या दोघांना दिले जातात.
सर्व पुरस्कार विजेत्या प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!
(विभाग – अंकाचे नाव – प्रकाशनाचे नाव)
विनोदी प्रथम – जत्रा – मेनका प्रकाशन, पुणे
विनोदी द्वितीय – हास्यधमाल – कलाकुंज प्रकाशन, नाशिक
विनोदी उत्तेजनार्थ – आवाज – आवाज प्रकाशन, बोरिवली
ललित प्रथम – शब्द शिवार – शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा
ललित द्वितीय – पर्ण – वसुंधरा प्रकाशन
ललित उत्तेजनार्थ – विनर्स – हार्ट पब्लिकेशन
विशिष्ट विषय प्रथम – चांगुलपणाची चळवळ – डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन
विशिष्ट विषय द्वितीय – कुळवाडी शाळा विशेषांक – सायास पब्लिकेशन
विशिष्ट विषय उत्तेजनार्थ – नृत्यावकाश – पदन्यास प्रकाशन, पुणे
उपयुक्त व छंदविषयक प्रथम – आपले छंद – दिनमार्क पब्लिकेशन्स, पुणे
उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – शतायुषी – डॉ. नितीन संगमनेरकर
उपयुक्त व छंदविषयक उत्तेजनार्थ – वेदान्तश्री: – वेदान्तश्री: प्रकाशन, पुणे
बालकुमार प्रथम – मनशक्ती बालकुमार – प्रमोदभाई शिंदे
बालकुमार द्वितीय – मुलांचे मासिक – जयंत माधव मोडक, नागपूर
संकीर्ण प्रथम – उद्याचा मराठवाडा – दै. उद्याचा मराठवाडा, नांदेड
संकीर्ण द्वितीय – लोकमंगल मैत्र – मैत्र प्रकाशन, सोलापूर
संकीर्ण उत्तेजनार्थ – साहित्य सावाना – सार्वजनिक वाचनालय, नाशिक
मुखपृष्ठ प्रथम – चांगुलपणाची चळवळ – डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन / चित्रकार- श्री. अन्वर हुसेन
मुखपृष्ठ द्वितीय – शब्द शिवार – शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा / चित्रकार- श्री. श्रीधर अंभोरे
मुखपृष्ठ उत्तेजनार्थ – शुभम – प्रिय प्रकाशन, पुणे / चित्रकार- श्री. प्रतीक काटे
यावर्षीच्या मान्यवर परीक्षकांमध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या भारतासहित विविध देशांत अतिशय यशस्वी ठरलेल्या उपक्रमाचे संस्थापक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकचे श्री. विनायक रानडे, सुप्रसिद्ध चित्रकार वसुधा कुलकर्णी आणि नामवंत मुद्रक श्री. नंदप्रसाद बर्वे यांचा समावेश होता.
सर्व पुरस्कारविजेत्या प्रकाशकांचे पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन!
पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नियोजन झाल्यावर त्याबाबत तपशील जाहीर केला जाईल.
अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी