Press "Enter" to skip to content

पुरस्कार सोहळ्याची निमंत्रणपत्रिका (२९ नोव्हेंबर २०२५)

नमस्कार!
दि. २९ नोव्हेंबर रोजीच्या आपल्या पुरस्कार सोहळ्याची निमंत्रणपत्रिका देत आहोत. सर्व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक, जीवनगौरव विजेत्यांचा सन्मान आपल्या सर्वांतर्फे होणार आहे. त्यामुळे सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. सर्व सभासद, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, लेखक, पुरस्कारांचे प्रायोजक, साहित्यप्रेमी अशा आपणा सर्वांना अगदी मनापासून हे निमंत्रण देत आहोत.
पुरस्कारांच्या प्रायोजकांचे देखील कौतुक आपण सोहळ्यात करणार आहोत. कार्यक्रमानंतरच्या स्नेहभोजनात अनौपचारिक गप्पा, ओळखी, संवाद यांची संधीही मिळत असते. सर्वांनी जरूर यावे ही विनंती. सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपण दोघे (किंवा एकटे) येत असल्याचा एक मेसेज कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे (9881435680) यांना करावा ही विनंती. पुरस्कारार्थींनी मेसेज करायची आवश्यकता नाही.

धन्यवाद!

अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि अ. भा. मराठी प्रकाशक संघ कार्यकारिणी.