Press "Enter" to skip to content

‘लेखनाचं ग म भ न!’

लेखनविषयक विशेष कार्यशाळा

नमस्कार!

आपल्याला सर्वांना माहीतच आहे की प्रकाशक संघ वेळोवेळी साहित्य क्षेत्रातील विविध घटकांना उपयुक्त, मार्गदर्शक ठरतील अशा कार्यशाळा घेत असतो. आपल्या सर्वांचा त्यांस उत्तम प्रतिसाद मिळतो, आणि सर्व सहभागी मंडळींसाठी त्या अतिशय माहितीपूर्ण व उपयुक्तही ठरतात.

आज प्रत्येक प्रकाशक उत्तम लेखनाच्या शोधात असतो. उत्तम लेखन करणारे लेखक निर्माण व्हावेत यासाठी त्या त्या लेखकाच्या मूळच्या लेखनप्रतिभेबरोबरच त्याने काही लेखनकौशल्ये जाणून घेऊन आत्मसात करणे आवश्यक ठरते. हीच गरज लक्षात घेऊन प्रकाशक संघ रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी लेखनविषयक कार्यशाळा आयोजित करत आहे. सर्व प्रकारचे ललित लेखन, समीक्षा लेखन व वृत्तपत्रांशी संबंधित (स्तंभ/सदर/अभिप्राय) लेखन, ब्लॉग राइटिंग अशा विविध पैलूंवर सहभागी मंडळींना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ लेखक श्री. राजा दीक्षित, ज्येष्ठ लेखिका नीलिमा बोरवणकर आणि लेखक, स्तंभलेखक व कौन्सिलर श्री. किरण आचार्य यांना आपण निमंत्रित केले आहे.

सर्व प्रकारच्या लेखनात रुची असलेल्या सर्व वयोगटांतील व्यक्तींना कार्यशाळा खुली असून, लेखकांबरोबरच प्रकाशक व प्रकाशकांकडील संपादक, भाषांतरकार, मुद्रितशोधक, अक्षरजुळणीकार अशा प्रत्येकासाठी बरंच काही शिकवणारी ही कार्यशाळा असणार आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठीची नोंदणी आजपासून सुरु करीत आहोत. आसनक्षमता मर्यादित आहे. आसनक्षमता पूर्ण झाल्यावर नोंदणी थांबवावी लागणार आहे. कार्यशाळा शुल्क केवळ रु. ५००/- असून यामध्ये सर्व तीनही सत्रे, चहापान व दुपारचे भोजन समाविष्ट असेल.

या कार्यशाळेत प्रकाशक संघाच्या सभासदांना आपल्या पुस्तकांचे जाहीर प्रकाशन करण्यासाठी खास वेळ राखून ठेवला जाणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीये. पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या मंडळींनी फक्त कार्यशाळा शुल्क भरणे आवश्यक असेल.

प्रकाशक संघाच्या खालील खात्यात आपले कार्यशाळा सहभाग शुल्क रु. ५००/- भरून संघाच्या कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे यांना (९८८१४३५६८० या क्रमांकावर) whatsapp मेसेजने कळवावे ही विनंती.

प्रकाशक संघाच्या खात्याचा तपशील:-

खात्याचे नाव:- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.

बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा:- शनिवार पेठ, पुणे.

बचत खाते क्र:- २०१३६९४२७३३

IFSC:- MAHB0000675

प्रत्येक सत्रानंतर काही मिनिटे श्रोत्यांना प्रश्नोत्तराच्या स्वरूपात वक्त्यांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे. सहभागासाठी अतिशय मर्यादित जागा आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.

कार्यशाळेचा विषय : ‘लेखनाचं ग म भ न!’

दिनांक : १ मार्च २०२६ (रविवार)

स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.

वेळ : सकाळी १० ते २

धन्यवाद!

प्रमुख कार्यवाह (अ. भा. म. प्रकाशक संघ)