नमस्कार!
आपल्या प्रकाशक संघाचे चौथे प्रकाशक-लेखक साहित्य संमेलन शनिवार दि. ६ व रविवार दि. ७ मे रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे हे आपल्याला माहीत आहेच. आपली संमेलने उत्तम कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याबरोबरच सर्वांना एकत्र येण्याची अप्रतिम संधी देतात याचा आपल्या सर्वांना अनुभव आहेच. या वेळचे विशेष म्हणजे या संमेलनाचे संपूर्ण आयोजन प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेकडून होत आहे. हे अतिशय कौतुकास्पद आहे. आपले प्रतिष्ठेचे जीवन गौरव व साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कारही या संमेलनात प्रदान केले जाणार आहेत. तसेच उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारही याच सोहळ्यात दिले जाणार आहेत.
या संमेलनासाठीची सहभाग नोंदणी आता सुरू करीत आहोत. दोन दिवसाच्या या संमेलनातील सर्व कार्यक्रम, ३ भोजने (दि. ६ दुपार व रात्र, दि. ७ दुपार.), २ ब्रेकफास्ट (दि. ६ सकाळ व दि. ७ सकाळ) ३ चहापान व दिनांक ६ रोजीच्या निवासव्यवस्थेसह (ट्वीन शेअरिंग एसी रुम) केवळ नाममात्र रुपये २००० शुल्क निश्चित केले आहे. आपण खालील दोन ठिकाणांपैकी एका ठिकाणी हे शुल्क भरू शकता.
१) प्रकाशक संघाच्या खालील खात्यावर किंवा ९८५०९६२८०७ (पराग लोणकर) या जीपे क्रमांकावर शुल्क भरून.
प्रकाशक संघाच्या खात्याचा तपशील:-
खात्याचे नाव:- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.
बँक:- बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा:- शनिवार पेठ, पुणे.
बचत खाते क्र:- २०१३६९४२७३३
IFSC:- MAHB0000675
किंवा
२) ९८९०९३३७९० (श्री. विलास पोतदार) या जीपे क्रमांकावर शुल्क भरून.
दोन्ही पैकी कोणत्याही ठिकाणी शुल्क भरल्यावर कृपया ९८८१४ ३५६८० (सौ. वीणा पेशवे – कार्यालयीन कार्यवाह) या whatsapp क्रमांकावर न विसरता शुल्क भरल्याची व उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची नावे वैयक्तिक कळवावीत ही विनंती.
नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त व उत्तम प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत.
धन्यवाद!
– अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ कार्यकारिणी