Press "Enter" to skip to content

प्रकाशक संघातर्फे पुस्तक प्रदर्शने

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की काही दिवसांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे प्रकाशक संघातर्फे आपण पुस्तक प्रदर्शने चालू करत आहोत. या प्रदर्शनांमध्ये पहिले प्रदर्शन दिनांक १ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत जळगाव येथे आपण भरवत आहोत. याबाबत प्रकाशक संघ कार्यकारिणीतर्फे गेले दोन-तीन महिने सर्वांगिण विचार चालू होता. पुस्तक प्रदर्शने भरवणे व्यवहार्य व्हावे व प्रकाशकांनाही फायदेशीर व्हावे या दृष्टीने काही निर्णय घ्यावे लागले आहेत.

१) या प्रदर्शनांसाठी प्रकाशक संघ प्रकाशकांकडून खर्चापोटी नाममात्र शुल्क आकारणार आहे. याचा तपशील पुढे दिला आहेच.

२) प्रकाशकांनी प्रकाशक संघास किमान ४० टक्के सवलतीत पुस्तके द्यावयाची आहेत.

३) आगामी जळगाव प्रदर्शनासाठी प्रकाशकांनी थेट जळगाव येथे पेड पार्सलने पुस्तके पाठवायची आहेत. पॅकिंगचा खर्च अर्थातच प्रकाशकाने करावयाचा आहे.

४) हे प्रदर्शन संपल्यानंतर २० दिवसाचे आत विक्री झालेल्या पुस्तकांची सवलत वजा जाता येणारी रक्कम प्रत्येक प्रकाशकास धनादेशाने किंवा त्यांच्या त्यांच्या खात्यात रक्कम जमा करून दिली जाणार आहे. जळगाव येथे विक्री न झालेली पुस्तके पुढच्या प्रदर्शनाकरता प्रकाशक संघाकडेच राहणार आहेत व संपलेल्या पुस्तकांची आॅर्डर प्रकाशकांना देण्यात येणार आहे. चार प्रदर्शने संपन्न झाल्यावर प्रकाशकांना त्यांची उरलेली पुस्तके परत केली जातील.

६) या प्रदर्शनांसाठी प्रकाशक संघाने पुढील प्रमाणे नाममात्र शुल्क आकारण्याचे ठरवले आहे.

हे शुल्क प्रत्येक पुस्तकाच्या तीन प्रतींसाठी आहे.

रुपये ५० पर्यंत किंमत असलेली पुस्तके – शुल्क रुपये १५ मात्र.

रुपये ५० ते २०० पर्यंत किंमत असलेली पुस्तके – शुल्क रुपये ४० मात्र.

रुपये २०० ते ५०० – शुल्क रु. ७५ मात्र.

रुपये ५००किंवा त्यावरील किंमत असलेली पुस्तके – शुल्क रु. १००/- मात्र.

प्रत्येक प्रकाशकाने प्रत्येक पुस्तकाच्या जास्तीत जास्त तीन प्रती द्यावयाच्या आहेत.

इतर प्रदर्शनांमध्ये मराठी व्यतिरिक्त इतर भाषांची (विशेषतः इंग्रजी) पुस्तकेही बऱ्याचदा प्राधान्याने ठेवली जातात. आपल्या प्रदर्शनांसाठी फक्त मराठी भाषेतील पुस्तकेच स्वीकारली जातील.

प्रकाशकांनी (त्यांच्या मतानुसार) प्रदर्शनात विक्रीयोग्य पुस्तके पाठवावीत.

*हे महत्वाचे लक्षात घ्यावे की* हे शुल्क चार प्रदर्शनांसाठी मिळून आहे. प्रकाशकांना फक्त नवीन ऑर्डर्सच्या पुढील तीन प्रती पाठवताना व चार प्रदर्शनानंतर परत पुस्तके पाठवताना हे शुल्क द्यावयाचे आहे. प्रकाशक संघाची प्रत्येक नवीन ऑर्डर ही तीन प्रतींची असणार आहे.

ज्या प्रकाशकांना असे प्रत्येक पुस्तकासाठी असलेले शुल्क द्यावयाचे नसेल त्यांना प्रकाशक संघाला आपण देत असलेल्या सवलतीपेक्षा दहा टक्के अधिक सवलत प्रकाशक संघास द्यावी लागेल. (म्हणजे एखादा प्रकाशक ४०% सवलतीत प्रकाशक संघास पुस्तक देणार असेल व त्यास पुस्तकाचे शुल्क द्यावयाचे नसेल तर त्यास त्याची पुस्तके ५०% सवलतीने द्यावी लागतील.) अश्या प्रकाशकांनी तसा स्पष्ट उल्लेख आपल्या चलन किंवा बिलावर करावा.

७) जळगाव प्रदर्शनासाठी आपली पुस्तके खालील पत्त्यावर पाठवावीत.
*श्री. युवराज माळी* – अथर्व पब्लिकेशन, २ नक्षत्र अपार्टमेंट हौ. सोसा., शाहू नगर, जळगाव-४२५००१. (भ्रमणध्वनी: ९७६४६९४७९७, ९४०५२०६२३०.

पुण्यातील प्रकाशक मंडळी *श्री प्रथमेश Travelsने* आपली पुस्तके पाठवावीत. (संध्याकाळी सातचे पूर्वी त्यांच्याकडे पुस्तके पोहोचवलीत तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचतात. एसटी पार्सलपेक्षा ते स्वस्तही पडते.) त्यांचे पुण्याचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक: २५५३६०६०, २५५३६६६३, ९३७०९०२१२२, ९१६८७१२१२२.

पुण्याबाहेरील प्रकाशकांनी पेड एसटी पार्सलने पुस्तके पाठवावीत.

८) पाठवत असलेल्या पुस्तकांचे चलन किंवा बिलाची एक प्रत (फोटोकाॅपी चालू शकेल) पुस्तकांबरोबर बंडलामध्ये ठेवावी. चलन किंवा बिलाची मूळ प्रत खर्चापोटीच्या शुल्काबरोबर प्रकाशक संघ कार्यालयात दु. २.३० ते ६.३० या कालावधीत श्री. भास्कर ढोबळे यांना सुपूर्द करावी. बाहेरगावच्या प्रकाशकांनी प्रकाशक संघाच्या खात्यात रक्कम भरून कुरियर/रजिस्टर्ड पोस्टाने ही प्रत पाठवावी.

९) शुल्क किंवा दहा टक्के अतिरिक्त सवलत देणाऱ्या प्रकाशकांचीच पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात येतील.

१०) या प्रदर्शनासाठी प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीची एक समिती नेमलेली आहे. श्री. दत्तात्रय पाष्टे, श्री. रमेश शेलार व श्री. सुकुमार बेरी हे या समितीचे सदस्य आहेत.

वरील कोणत्याही बाबतीत काही शंका असल्यास श्री. भास्कर ढोबळे (७३५००१५७५६) यांना संपर्क करावा.

कृपया प्रकाशकांनी हे लक्षात घ्यावे की प्रकाशक संघाचा हा धाडसी अभिनव उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच यशस्वी होऊ शकेल.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेसह धन्यवाद!

– पराग लोणकर
(कार्यवाह)