पुरस्कार विजेते दिवाळी अंक आणि प्रकाशक
वर्ष २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांतील पुढील अंकांची- श्री. राजीव तांबे, श्री. रवींद्र जोशी आणि श्री. सागर नेने या माननीय परीक्षकांनी- पुरस्कारांसाठी निवड केलेली आहे. सर्व पुरस्कार दिवाळी अंकांच्या प्रकाशकांना दिले जातात व मुखपृष्ठासाठीचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार या दोघांना दिले जातात.
सर्व पुरस्कार विजेत्या प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!
(विभाग – अंकाचे नाव – प्रकाशनाचे नाव)
विनोदी – या विभागात पुरस्कार निवड नाही.
ललित प्रथम – आपले छंद – दिनमार्क पब्लिकेशन्स, पुणे
ललित द्वितीय – सर्जनशीलतेचा नवाविष्कार – शब्दवेल साहित्य मंच, मुंबई
ललित उत्तेजनार्थ – मैत्र – मैत्र प्रकाशन, सोलापूर
विशिष्ट विषय प्रथम – चांगुलपणाची चळवळ – डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन
विशिष्ट विषय द्वितीय – शब्दोत्सव – ममता प्रकाशन, बडनेरा रोड
विशिष्ट विषय उत्तेजनार्थ – समदा – समदा क्रिएशन, चिंचवड
उपयुक्त व छंदविषयक प्रथम – दुर्गांच्या देशातून… – दुर्गभान प्रकाशन, पुणे
उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – शब्दालय – शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
उपयुक्त व छंदविषयक उत्तेजनार्थ – अर्थशक्ति – अर्थशक्ति प्रकाशन, मुलुंड
बालकुमार प्रथम – छावा – केसरी-मराठा ट्रस्ट, पुणे
बालकुमार द्वितीय – निर्मळ रानवारा – वंचित विकास, पुणे.
संकीर्ण प्रथम – गोमन्तक – दै. गोमन्तक प्रा. लि., गोवा.
संकीर्ण द्वितीय – उद्याचा मराठवाडा – दै. उद्याचा मराठवाडा, नांदेड
संकीर्ण उत्तेजनार्थ – पृथा – मैत्री पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठ प्रथम – समदा – समदा क्रिएशन, चिंचवड / चित्रकार- श्रद्धा कडू
मुखपृष्ठ द्वितीय – आपले छंद – दिनमार्क पब्लिकेशन्स, पुणे / चित्रकार- राहुल शिंदे
मुखपृष्ठ उत्तेजनार्थ – चांगुलपणाची चळवळ – डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन / चित्रकार – श्री. अन्वर हुसेन
सर्व पुरस्कार प्राप्त प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!
रविवार दि. २८ एप्रिल रोजी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रस्ता, पुणे येथे सकाळी ठीक ९.३० वाजता- आपल्या प्रकाशक संघातर्फे दिल्या जाणाऱ्या अतिशय प्रतिष्ठेच्या जीवनगौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारांबरोबर हे उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. आपण सर्व प्रकाशक व मुखपृष्ठ विभागात पुरस्कार मिळालेले चित्रकार यांनी समक्ष उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावेत ही विनंती.
– अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी