नमस्कार!
फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स ने येत्या ११ व १२ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे भारतातील सर्व भाषांमधील प्रकाशकांची एक परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत प्रत्येक भाषेमधील एका प्रकाशकाचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘Outstanding Publisher in Marathi Language’ या पुरस्कारास पात्र होण्यासाठी त्यांनी प्रकाशक संघाकडून जास्तीत जास्त ६ प्रकाशकांची नावे मागवली आहेत. या नावांमधील एकाची निवड होऊ शकणार आहे. प्रकाशनांच्या नावांबरोबर या प्रकाशनांच्या कार्याबाबत त्यांनी काही तपशील देखील मागवला आहे.
या पुरस्कारासाठी त्यांनी पुढील निकष कळवलेले आहेत.
१) प्रकाशक संस्था किमान वीस वर्षे जुनी असून ती सध्या कार्यरत असली पाहिजे.
२) प्रकाशक संस्थेने गेल्या वीस वर्षांमध्ये किमान २५०हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन केलेले असणे आवश्यक आहे.
३) वर्ष २०२० ते वर्ष २०२३ या कालावधीत प्रकाशक संस्थेने किमान १०हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली असणे आवश्यक आहे.
४) प्रकाशन संस्था राज्यातील प्रकाशकांच्या संघटनेशी संलग्न असणे आवश्यक आहे.
५) प्रकाशित ग्रंथांना पुरस्कार मिळालेल्या प्रकाशकांना, पुरस्कार मिळालेल्या लेखकांची पुस्तकं प्रकाशित केलेल्या प्रकाशन संस्थांना प्राधान्य असेल.
वरील निकषांना पात्र असलेल्या प्रकाशकांनी खालील अतिरिक्त माहिती पुरवावयाची आहे.
१) प्रकाशक संस्थेशी संलग्न असलेल्या लेखकांची नावे व संख्या.
२) प्रकाशक संस्थेला किंवा प्रकाशक संस्थेच्या लेखकांना मिळालेल्या पारितोषिकांची माहिती.
३) ग्रंथ जत्रांमध्ये प्रकाशक संस्थांनी सहभाग घेतला असल्यास, त्यांची माहिती.
४) प्रकाशन विश्वात प्रकाशन संस्थेने काही महत्वाचे कार्य केले किंवा कार्ये केली असतील तर त्याबाबतची माहिती.
वरील निकषांना पात्र असणाऱ्या प्रकाशकांनी आपली वर नमूद केलेली सर्व माहिती कृपया शनिवार दि. १५ जुलै २०२३ – सायंकाळी ५ वाजेपर्यन्त प्रकाशक संघाच्या marathiprakashaksangh@gmail.com या ईमेलवर पाठवावी.
सर्व माहिती व्यवस्थित संगणकीय टंकलेखन करून त्याची pdf मेल करावी. सर्व माहिती इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत व एकाच pdf मध्ये असावी.
धन्यवाद!
प्रमुख कार्यवाह