Press "Enter" to skip to content

पुस्तकांचे गाव भिलार येथे होणारे लेखक- प्रकाशक संमेलन

८ आणि ९ डिसेंबर रोजी महाबळेश्वरजवळील भिलार येथे होणाऱ्या कार्यशाळेचे नाव बदलून आता पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने *’पुस्तकांचे गाव भिलार येथे होणारे लेखक- प्रकाशक संमेलन’*

या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, उद्या- येणाऱ्या पाहुण्यांची नावे जाहीर करीत आहोत.

प्रकाशक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण माननीय विनोदजी तावडे यांची भेट घेऊन दिले.
*मा. विनोदजी तावडे* यांचे हस्ते या संमेलनाचे आठ तारखेला सकाळी उद्घाटन होणार आहे.

कृपया ज्यांनी अजूनही नोंदणी केली नसेल त्यांनी कृपया पुढील दोन क्रमांकांपैकी एकावर तातडीने नोंदणी करावी.
१) पराग लोणकर – ९८५०९६२८०७
२) भास्कर ढोबळे – ७३५००१५७५६

धन्यवाद!

– *पराग लोणकर (भिलार संमेलन प्रमुख)*