आपल्या प्रकाशक संघाच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहोळा काल नाशिक येथे मोठ्या थाटामाटात साजरा झाला.
संत साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक प्राचार्य श्री. दिलीप धोंगडे हे प्रमुख पाहुणे होते. संघाचे प्रमुख कार्यवाह श्री. पराग लोणकर यांनी शाखा विस्ताराची संघाची भूमिका व्यक्त केली तर संघाचे माननीय अध्यक्ष श्री. राजीव बर्वे यांनी संघ करीत असलेली कामे, शाखेकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करून नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
पुण्याहून प्रकाशक संघाचे श्री. अविनाश पंडित, श्री. सुकुमार बेरी, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, श्री. विशाल सोनी व श्री. भास्कर ढोबळे आणि जळगाव येथून श्री. युवराज माळी हेही या कार्यक्रमास उपस्थित होते.
या सोहोळ्याची काही क्षणचित्रे:-