Press "Enter" to skip to content

तिसरे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन

नमस्कार!

आपल्या सातारा येथील संमेलनाचे सर्व कार्यक्रम निश्चित झाले असून संपूर्ण कार्यक्रमपत्रिका पुढे देऊन सर्वांना आमंत्रण देत आहोत.

हे संमेलन बऱ्याच मोठ्या काळानंतर परगावी एकत्र येण्याची, चर्चा, गप्पा आणि परिसंवाद यांचा आनंद घेण्याची, आपल्या जिव्हाळ्याच्या विषयांवर मान्यवरांना ऐकण्याची, आपल्या सर्वांना संधी उपलब्ध करत आहे. आपल्या प्रकाशक संघाच्या प्रत्येक संमेलनाप्रमाणेच हा सोहोळादेखील आनंदसोहोळा होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने आपले हेही संमेलन आपण यशस्वी करुयात, असा विश्वास वाटतो.

निवास व्यवस्थेच्या आखणीचे दृष्टीने- अजूनही ज्या मंडळींनी आपल्या सहभागाची नोंदणी केली नसेल त्यांनी तातडीने करावी.

नोंदणीसाठी संपर्क: वीणा पेशवे (९८८१४३५६८०)

– अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी.