Press "Enter" to skip to content

उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार २०२३ साठी दिवाळी अंक पाठवण्याबाबत!

नमस्कार!

आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना निर्मिती पुरस्कार दिले जातात व हे निर्मिती पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जातात हे आपणास माहीत आहेच. मोठ्या समारंभात हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान केले जातात.

यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२३ मध्ये प्रकाशित दिवाळी अंक मागवत आहोत. आपल्या प्रकाशक संघातर्फे विनोदी, ललित, बाल-कुमार, उपयुक्त व छंदविषयक, विशिष्ठ विषय व संकीर्ण अशा विभागांत दिवाळी अंकांना पुरस्कार दिले जातात. संघातर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव पुरस्कार असे आहेत की जे पुरस्कार उत्कृष्ट निर्मितीसाठी दिले जातात आणि ते अंकाच्या प्रकाशकांस दिले जातात. वरील विभागांबरोबरच स्पर्धेसाठी आलेल्या अंकांतील उत्कृष्ट मुखपृष्ठांसाठी अंक निवडले जाऊन या अंकांच्या चित्रकारांना सन्मानित केले जाते. आपण या विभागासाठीही आपला अंक पाठवू शकता.

तरी आपल्यापैकी ज्या मंडळींनी या (२०२३) वर्षी दिवाळी अंक प्रकाशित केले असतील त्यांनी आपल्या प्रकाशित झालेल्या अंकांची प्रत्येकी एक प्रत या स्पर्धेसाठी आपल्या संघाच्या खालील पत्त्यावर पोस्ट/कुरीयरने अथवा समक्ष पाठवावी.

आपले दिवाळी अंक पाठवण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४.

स्पर्धेसाठी पाठवलेल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन/प्रकाशक अ. भा. मराठी प्रकाशक संघाचे सभासद असणे आवश्यक आहे.

अंक पाठवण्यासाठी पत्ता:

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ

२५१ क, शनिवार पेठ, मुठेश्वर चौक, पुणे-४११०३०.

भ्रमणध्वनी – ९८८१४३५६८०.

धन्यवाद!

प्रमुख कार्यवाह.