अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा, रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी मे. डायमंड पब्लिकेशन, शनिवार पेठ, पुणे-३० येथे सकाळी १०.०० वाजता बोलावली होती. सकाळी १० वाजता आवश्यक गणसंख्या नसल्याने तहकूब करण्यात आलेली सभा त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर म्हणजे ठीक १०.३० वाजता सुरु झाली.
सभेला संस्थेचे खालील सभासद उपस्थित होते.
श्री. राजीव बर्वे, श्री. दत्तात्रय पाष्टे, श्री. सुकुमार बेरी, श्री. पराग लोणकर, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, श्री. जयदीप कडू, श्री. युवराज माळी, सौ. अमृता कुलकर्णी, श्री. किरण आचार्य, श्री. शरद गोगटे, सौ. शशिकला उपाध्ये, श्री. अशोक सातपुते, श्री. मिलिंद परांजपे, श्री. सुनील अंबिके, श्री. मकरंद टोणपे.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. राजीव बर्वे होते.
सामूहिक राष्ट्रगीताने वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात झाली.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. राजीव बर्वे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.
अध्यक्षांच्या प्रास्ताविकानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजास सुरुवात झाली.
१) प्रथम संघाचे प्रमुख कार्यवाह श्री. पराग लोणकर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटिशीचे वाचन केले.
२) त्यानंतर दिवंगत झालेल्या सभासद व साहित्य क्षेत्रातील मंडळींना सभेने श्रद्धांजली वाहिली.
३) त्यानंतर संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. किरण आचार्य यांनी मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. ते मंजूर करण्यात आले.
४) त्यानंतर सन २०२४-२०२५ या वर्षाचा संस्थेचा अहवाल संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री. पराग लोणकर यांनी सादर केला.
५) वार्षिक अहवाल सादर झाल्यानंतर संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. सुकुमार बेरी यांनी सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात झालेल्या जमाखर्चाचा ताळेबंद सभेपुढे मांडला. त्यावर चर्चा झाली. यातील काही मुद्द्यांवर सभासदांनी प्रश्न विचारले, ज्यांचा संघाचे मा. अध्यक्ष व मा. कोषाध्यक्ष यांच्याकडून खुलासा करण्यात आला. त्यानंतर सभेने या जमाखर्च व ताळेबंदास मंजूरी दिली.
६) यानंतर संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. सुकुमार बेरी यांनी वैधानिक लेखापरीक्षकांचा लेखापरीक्षण अहवाल वाचून दाखवला. सभेने त्या अहवालाची नोंद घेतली आणि त्याला मंजुरी दिली.
७) त्यानंतर संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. सुकुमार बेरी यांनी वर्ष २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाचे वाचन केले. संस्थेच्या कार्यकारिणीने सुचवलेल्या उत्पन्न आणि खर्च यांच्या या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन सभेने ते मंजूर केले.
८) अखेरीस संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षकाच्या पदासाठी श्री. अविनाश ओगले यांची नेमणूक सभेने केली. श्री. ओगले यांना रुपये पंधरा हजार मानधन देण्यात यावे असे ठरले.
वार्षिक सभेचे असे नियमित कामकाज पूर्ण झाल्यावर आयत्या वेळच्या विषयांमध्ये काही उपस्थित सभासदांनी उपस्थित केलेल्या खालील मुद्यांवर फार चांगली चर्चा झाली. यामध्ये-
१) प्रकाशक संघाचे आगामी पाचवे प्रकाशक-लेखक साहित्य संमेलन,
२) प्रकाशक संघाचा आगामी ग्रंथनिर्मिती व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार सोहळा,
३) ग्रंथालयांच्या समस्या व अनुदानास होणारा विलंब,
४) शाळा व महाविद्यालयाकडून ग्रंथखरेदीबाबत दाखवले जाणारे औदासिन्य, अशा ठिकाणी ग्रंथपालांची नियुक्ती न होणे असे विषय चर्चिले गेले.
प्रकाशक संघाच्या आगामी संमेलन व ग्रंथनिर्मिती पुरस्कारांबाबत या चर्चेनंतर पुढील निर्णय घेण्यात आला आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये संमेलनाचे आयोजन होऊ शकल्यास याच संमेलनात निर्मिती पुरस्कार दिले जातील, आणि नोव्हेंबरमध्ये संमेलन शक्य न झाल्यास नोव्हेंबरमध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करून वर्ष २०२६च्या जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आपले संमेलन आयोजित करण्यात येईल.
या चर्चेनंतर संघाचे मा. अध्यक्ष श्री. राजीव बर्वे यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले.
– प्रमुख कार्यवाह