आगामी ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री. विश्वास पाटील यांचा आज प्रकाशक संघाच्या कार्यालयात आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे प्रकाशक संघाचे संस्थापक सदस्य व विद्यमान सल्लागार श्री. शरद गोगटे आणि प्रकाशक संघाचे अध्यक्ष श्री. राजीव बर्वे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मा. पाटील सरांनी संघाच्या कार्यकारिणी सदस्यांशी प्रकाशकांच्या आणि ग्रंथालयांच्या अडचणींवर अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ग्रंथालये सशक्त करण्यासाठीचे व वाचन संस्कृतीला चालना देणारे त्यांच्या विचाराधीन असलेले संकल्प अतिशय महत्वाचे आहेत. ‘ग्रंथपालांना किमान वेतन मिळाले पाहिजे, तेरा वर्षे झाली ग्रंथालये वाढली नाहीत, गाव तेथे ग्रंथालय ही चळवळ परत सुरू व्हायला पाहिजे, ग्रंथालयांचे ग्रंथ दुप्पट करा या माझ्या भूमिका मी कोणत्याही परिस्थितीत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडणार आहे,’ असे त्यांनी सर्व उपस्थित प्रकाशकांना सांगितले.
प्रमुख कार्यवाह

