Press "Enter" to skip to content

‘आजची पुस्तक विक्री! – आजार आणि उपाय’

*चर्चासत्र/परिसंवाद

काही दिवसांपूर्वी प्रकाशकांनी, संघाकडे मागणी केल्याप्रमाणे विक्रीबाबत मार्गदर्शक होईल असे चर्चासत्र आपण *रविवार दि. १८ आॅगस्ट* रोजी आयोजित करीत आहोत.

पुस्तक विक्री क्षेत्रातील अनेक दशकांचा दांडगा अनुभव असणारे व आजही जोमाने कार्यरत असलेले मान्यवर वक्ते आपण आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत आहोत.

आता सर्व कार्यक्रम ठरला असून कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.

सकाळी १०.०० ते १०.१५
प्रास्ताविक
*अाजची पुस्तक विक्री – आजाराचे स्वरुप*
साै. शशिकला उपाध्ये

सकाळी १०.१५ ते १०.४५
*उपस्थित प्रकाशकांची मनोगते व प्रश्न*

सकाळी १०.४५ ते ११.४५
*’पुस्तक विक्री- कालची आणि आजची’*
श्री. अनिल मेहता
श्री. सुनील मेहता
श्री. अशोक कोठावळे
श्री. शैलेश नांदुरकर

सकाळी ११.४५ ते दु. १२.४५
*’अवाजवी कमिशन- काळाची गरज?’*
श्री. अनिल कुलकर्णी
श्री. रमेश राठीवडेकर
श्री. उदय पाटील
श्री. राजू ओंबासे

दु. १२.४५ ते दु. १.४५
*’निरनिराळ्या सरकारी पुस्तक खरेदी योजना- प्रकाशकांसाठी मोठा आधार’*
श्री. राजीव बर्वे
श्री. साकेत भांड

विषय व वक्ते पाहता या चर्चासत्रातून प्रकाशन व पुस्तक विक्री व्यवसायात टिकून राहण्यासाठी आपल्या प्रत्येकाला नवीन उर्जा, नवीन प्रेरणा व नवीन मार्ग मिळतील अशी आमची खात्री आहे.

संघाच्या सभासदांपैकी (आपल्यापैकी) ज्यांना याबाबत आपले विचार, प्रश्न मांडायचे असतील त्यांच्यासाठी खास सत्र ठेवले गेले अाहे. हे सत्र बाकी सत्रांच्या आधी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मान्यवर वक्ते त्यांच्या भाषणात देऊ शकतील. सर्व वक्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत हजर राहणार आहेत.

सकाळी १०:०० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून दुपारी १.४५ नंतर भोजन करुन सांगता होणार आहे. आपण सर्वांनी स. ९:३० वाजता उपस्थित राहून नाश्ता व चहापानाचा आस्वाद घ्यायचा आहे.

कार्यक्रमाच्या वातानुकूलीत सभागृहाची आसन व्यवस्था मर्यादित असल्याने सर्वांनी लवकरात लवकर प्रकाशक संघ कार्यालयात अथवा खालील बँक खात्यात शुल्क भरून आपली नावनोंदणी करावी ही विनंती! प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा पद्धतीने नोंदणी होणार असून आसनक्षमता भरल्यावर नाईलाजाने नोंदणी थांबवावी लागणार आहे याची कृपया नोंद घ्यावी

*दिनांक :रविवार, दिनांक १८ ऑगस्ट २०१९

*स्थळ : भारत इतिहास संशोधन मंडळाचे मागील बाजूचे वातानुकुलीत सभागृह (भरत नाट्य मंदिराशेजारी.)

*वेळ : सकाळी ९:३०.

*शुल्क : केवळ ₹ ३००/- (चहा-नाश्ता-भोजनासह) आपण एकापेक्षा अधिक प्रतिनिधींची (आपला कार्यालयीन कर्मचारी वर्ग इ.) नोंदणी करू शकता.

ज्या ज्या मंडळींना आपले विचार किंवा प्रश्न मांडायचे असतील त्यांनी अापले प्रश्न दि. १० आॅगस्टपूर्वी कृपया ९८५०९६२८०७ या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर कळवावेत ही विनंती!
*- पराग लोणकर*
*कार्यवाह-अ.भा. मराठी प्रकाशक संघ.*

*बँक खात्याचा तपशील*
*बँक:-* बँक ऑफ महाराष्ट्र,
*शाखा:-* शनिवार पेठ, पुणे.
*खात्याचे नाव:-* अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.
*बचत खाते क्र:-* २०१३६९४२७३३
*IFSC:-* MAHB0000675

खात्यात रक्कम भरल्यानंतर कृपया न विसरता श्री. भास्कर ढोबळे- कार्यालयीन कार्यवाह (भ्रमणध्वनी क्रमांक:- ७३५००१५७५६) यांना फोन करून अथवा एसएमएसने कळवावे ही विनंती!

वरील चर्चासत्र व परिसंवादासाठीची नोंदणीमर्यादा आता पूर्ण होत आली आहे. केवळ दहा व्यक्तींची आता नोंदणी घेणे शक्य आहे.

आसन व्यवस्था भरल्यानंतर अधिकची नोंदणी घेता येणार नाही व या चांगल्या व उपयुक्त कार्यक्रमास मुकावे लागेल.

त्यामुळे ज्या ज्या मंडळींना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ताबडतोब प्रकाशक संघाच्या खात्यावर किंवा कार्यालयात शुल्क भरुन नोंदणी करावी ही विनंती.

– पराग लोणकर
(कार्यवाह – प्रकाशक संघ)