प्रिय सभासद!
सप्रेम नमस्कार!
रविवार दिनांक २८ एप्रिल रोजीच्या आपल्या सोहळ्याचे निमंत्रणपत्र सोबत दिले आहे.
आपल्या प्रकाशक संघाचे अतिशय मानाचे पुरस्कार या सोहळ्यात प्रदान केले जाणार आहेत. याचबरोबर या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका आणि अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी ‘भाषांतर युग ते अनुवाद युग’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.
तरी, या सोहळ्यास आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे. भोजन व्यवस्थेच्या दृष्टीने कृपया आपण (१/२) येत असल्याचे ९८५०९६२८०७ या क्रमांकावर (पराग लोणकर- प्रमुख कार्यवाह) WhatsApp मेसेजने कळवावे ही विनंती.
या आपल्या घरच्या सोहळ्यास आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत.
धन्यवाद!
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ कार्यकारिणी