Press "Enter" to skip to content

प्रकाशकांसाठीचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२४

पुरस्कार विजेते ग्रंथ आणि प्रकाशक

नमस्कार!

वर्ष २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांची- श्री. राजीव तांबे, श्री. रवींद्र जोशी आणि श्री. सागर नेने या माननीय परीक्षकांनी- पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! हे सर्व पुरस्कार प्रकाशकांसाठी असून मुखपृष्ठांचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार असे दोघांनाही दिले जातात.

सर्व पुरस्कारप्राप्त प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

(विभाग – पुस्तकाचे नाव – प्रकाशनाचे नाव)

ललित प्रथम – शब्द कल्पिताचे – शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक

ललित द्वितीय – काहूर एका वादळाचे – राजहंस प्रकाशन, पुणे

ललित उत्तेजनार्थ – पेसोआच्या कविता – वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव

ललितेतर प्रथम – उदयास्त मंगोल साम्राज्यांचा – संगणक प्रकाशन, अंबरनाथ

ललितेतर द्वितीय – नियतीचा विलक्षण खेळ – मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई

ललितेतर उत्तेजनार्थ – स्त्रियांची आत्मचरित्रे – संस्कृती प्रकाशन, पुणे

संदर्भ ग्रंथ प्रथम – एक तरी ओवी – नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

संदर्भ ग्रंथ द्वितीय – युगप्रवर्तक अद्वितीय संत तुकाराम – परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे

संदर्भ ग्रंथ उत्तेजनार्थ – विंदांचे काव्यविश्व – सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा

उपयुक्त व छंदविषयक प्रथम – स्वयम् ३६५ – सकाळ मीडिया प्रा. लि. पुणे

उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – गाता रहे… – राजहंस प्रकाशन, पुणे

उपयुक्त व छंदविषयक उत्तेजनार्थ – पाहावें आपणासि आपण | – समर्थ मीडिया सेंटर, पुणे

विज्ञानविषयक प्रथम – निसर्गकल्लोळ – राजहंस प्रकाशन, पुणे

विज्ञानविषयक उत्तेजनार्थ – डेटा सायन्स – बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे

शिशुसाहित्य प्रथम – इटुकली पिटुकली – इसाप प्रकाशन, नांदेड

शिशुसाहित्य उत्तेजनार्थ – साचीच्या गोष्टी – साकेत प्रकाशन, छ. संभाजीनगर

बालसाहित्य प्रथम – टमरक टूं – चेतक बुक्स, पुणे

बालसाहित्य उत्तेजनार्थ – गम्माडी गम्मत – भरारी प्रकाशन, मुंबई

कुमारसाहित्य प्रथम – झाड एक मंदिर – दिलीपराज प्रकाशन, पुणे

कुमारसाहित्य उत्तेजनार्थ – फुलांचे संमेलन – यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे

मुखपृष्ठ (प्रौढ) प्रथम – रुळानुबंध – शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक/ चित्रकार: विजय बिस्वाल

मुखपृष्ठ (प्रौढ) द्वितीय – दीर्घ – वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव/ चित्रकार: चंद्रमोहन कुलकर्णी

मुखपृष्ठ (प्रौढ) उत्तेजनार्थ – प्रासंगिक प्रसाद – संवेदना प्रकाशन, पुणे/ चित्रकार: संतोष घोंगडे

मुखपृष्ठ (बाल) प्रथम – इटुकली पिटुकली – इसाप प्रकाशन, नांदेड/ चित्रकार: संतोष घोंगडे

मुखपृष्ठ (बाल) द्वितीय – ‘कोको’ची डायरी – सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा/ चित्रकार: रोहन पोरे

मुखपृष्ठ (बाल) उत्तेजनार्थ – श्लोक कथा – राजेंद्र प्रकाशन, मुंबई/ चित्रकार: पुंडलिक वझे

प्रकाशक-लेखक (प्रौढ) प्रथम – ओघळलेले मोती – संचित प्रकाशन, गोवा

प्रकाशक-लेखक (प्रौढ) उत्तेजनार्थ – चहा आणि लेखक – मधुश्री प्रकाशन, पुणे

जाहिराती व ग्रंथप्रचार साहित्य प्रथम – कविता सागर प्रकाशन डायरी २०२३ – कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर

जाहिराती व ग्रंथप्रचार साहित्य उत्तेजनार्थ – प्रकाशन ग्रंथ सूची – शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर

ग्रामीण व निमशहरी प्रथम – माणुसकीचा गाव – अक्षरबंध प्रकाशन, नीरा

ग्रामीण व निमशहरी द्वितीय – वर्तुळ भाग-२ – गुरुप्रज्ञा प्रकाशन, बदलापूर

ग्रामीण व निमशहरी उत्तेजनार्थ – भांगोरा – सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा

सर्व पुरस्कार प्राप्त प्रकाशकांचे पुन:श्च मन:पूर्वक अभिनंदन!

रविवार दि. २८ एप्रिल रोजी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रस्ता, पुणे येथे सकाळी ठीक ९.३० वाजता – आपल्या प्रकाशक संघातर्फे दिल्या जाणाऱ्या अतिशय प्रतिष्ठेच्या जीवनगौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारांबरोबर हे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. आपण सर्व प्रकाशक व मुखपृष्ठ विभागात पुरस्कार मिळालेले चित्रकार यांनी समक्ष उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावेत ही विनंती.

– अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी