नमस्कार!
प्रकाशक संघातर्फे विविध विभागांमध्ये पुस्तकांना व दिवाळी अंकांना दिले जाणारे निर्मिती पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. केवळ प्रकाशकांना दिले जाणारे हे एकमेव आणि प्रतिष्ठित पुरस्कार आहेत हे आपण जाणताच.
दर वर्षीप्रमाणे हे पुरस्कार पुरस्कृत करण्याचे आवाहन प्रकाशक संघ संघाच्या सभासदांना करत आहे.
ग्रंथनिर्मिती पुरस्कारांच्या खालील विभागातील पुरस्कार आपण पुरस्कृत करू शकता
अनु. क्र. विभाग- पुरस्कार
(१) ललित- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
(२) ललितेतर- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
(३) संदर्भ- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
(४) उपयुक्त व छंदविषयक- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
(५) विज्ञानविषयक- प्रथम/उत्तेजनार्थ
(६) शिशुसाहित्य- प्रथम/उत्तेजनार्थ
(७) बाल साहित्य- प्रथम/उत्तेजनार्थ
(८) कुमार साहित्य- प्रथम/उत्तेजनार्थ
(९ अ) मुखपृष्ठ (प्रौढ)- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
(९ ब) मुखपृष्ठ (बाल) – प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
(१० अ) प्रकाशक-लेखक (प्रौढ)- प्रथम/उत्तेजनार्थ
(११) जाहिरात व प्रसार- प्रथम/उत्तेजनार्थ
(१२) ग्रामीण/निमशहरी- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
खालील दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार आपण पुरस्कृत करू शकता
अनु. क्र. विभाग- पुरस्कार
(२) ललित- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
(३) विशिष्ट विषय- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
(४) उपयुक्त व छंदविषयक- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
(५) बाल-कुमार- प्रथम/द्वितीय
(६) संकीर्ण (इतर)- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
(७) मुखपृष्ठ- प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ
ज्या सदस्यांस पुरस्कार पुरस्कृत करावयाचे असतील, ते आपल्या इच्छेप्रमाणे पुरस्कारांची निवड करून ते पुरस्कार पुरस्कृत करू शकतात. (आपण कितीही पुरस्कार पुरस्कृत करू शकता.) आपण निवडलेल्या पुरस्काराच्या सन्मानचिन्हावर पुरस्कर्त्याच्या किंवा त्याने सुचवलेल्या व्यक्तीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असणार आहे. अशा प्रायोजकत्वाचे देणगीमूल्य (प्रत्येकी) केवळ रु. २,०००/- आहे. हे पुरस्काराचे प्रायोजकत्व एका वर्षासाठी असणार आहे. पुढील वर्षी पुन्हा देणगीमूल्य देऊन आपण आपले प्रायोजकत्व चालू ठेवू शकता.
आपण आपल्या, आपल्या संस्थेच्या नावाने किंवा आपल्या आप्त/स्नेहीजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने असे प्रायोजकत्व देऊ शकता. यामुळे पुरस्कार विजेत्याच्या सन्मानचिन्हावर या नावाची दीर्घकाळासाठी सन्माननीय नोंद नोंदवली जाणार आहे.
कार्यक्रमात कोणातर्फे- कोणाच्या नावाने- हा पुरस्कार आहे हे जाहीर केले जाईलच.
या उपक्रमास आपले प्रायोजकत्व देण्यासाठी कृपया आपल्या संघाचे प्रमुख कार्यवाह श्री. पराग लोणकर (९८५०९६२८०७) यांना कृपया संपर्क करावा ही विनंती.
आपल्या प्रायोजकत्वाबरोबर आपण सुचविलेल्या नावाची सन्मानचिन्हावर नोंद होण्याचे दृष्टीने कृपया येत्या १० एप्रिल २०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वरील क्रमांकावर तातडीने संपर्क करावा ही विनंती.
यावर्षी आपल्या सर्वांचा मागील वर्षांहून अधिक प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो.
धन्यवाद!
– अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ कार्यकारिणी