Press "Enter" to skip to content

‘जीवन गौरव’, ‘साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार’, ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार

‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघा’तर्फे यंदा *‘जीवन गौरव’* पुरस्काराने लातूरच्या भारतीय पुस्तकालयाचे संस्थापक-संचालक *श्री. भानुदास जोशी* यांना सन्मानित केले जाणार आहे.

प्रकाशक संघातर्फे यंदा *‘साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार’ने ज्येष्ठ विज्ञान लेखक श्री. निरंजन घाटे* यांना सन्मानित करण्यात येणार आहे. २०१८ मधील *‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती’* आणि *‘उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती’* पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात येईल.

या समारंभास अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा *डॉ. अरुणा ढेरे* व प्रमुख पाहुणे म्हणून माजी संमेलनाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष *डॉ. सदानंद मोरे* उपस्थित राहणार आहेत. याच समारंभात प्रकाशक संघाच्या आजीव सदस्यांना आजीव सदस्यत्वाची प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत. आपण सर्वांनी या समारंभास आणि त्यानंतर आयोजित केलेल्या भोजन समारंभास अवश्य उपस्थित राहावे ही विनंती!

*स्थळ :* पदमजी सभागृह, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड, पुणे.

*वेळ :* रविवार, दि. २१ एप्रिल २०१९. सकाळी १०.०० वाजता.

*उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार – २०१९*

*पुरस्कारप्राप्त प्रकाशक*

*ललित साहित्य*
प्रथम पुरस्कार
मोघ पुरूस (प्रतिक पुरी)
विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे

द्वितीय पुरस्कार
यंग इंडियाचा ग्रुप सेल्फी (लक्ष्मीकांत देशमुख)
दिलीपराज प्रकाशन, पुणे

उत्तेजनार्थ
मन केले ग्वाही (डॉ. अरुणा ढेरे)
सुरेश एजन्सी, पुणे

*ललितेतर साहित्य*
प्रथम पुरस्कार
मोठी तिची सावली (मीना मंगेशकर-खडीकर)
परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई

द्वितीय पुरस्कार
कवितेच्या शोधात (विजय पाडळकर)
राजहंस प्रकाशन, पुणे

उत्तेजनार्थ
वामन निंबाळकरांची कविता… (प्रा. रूपाली अवचरे)
यशोदीप पब्लिकेशन्स्, पुणे

*संदर्भ ग्रंथ*
प्रथम पुरस्कार
तावडी बोली (अशोक कौतिक कोळी)
अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव

द्वितीय पुरस्कार
ऐसी अक्षरे रसिके (भास्कर हरी वझे)
नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

*उपयुक्त / छंदविषयक*
प्रथम पुरस्कार
जिम्नॅस्टिक्स (मोरेश्वर ध. गुर्जर)
समर्थ मिडिया सेंटर, पुणे

द्वितीय पुरस्कार
लाईफस्टाईल (डॉ. रमा मराठे)
साकेत प्रकाशन, औरंगाबाद

उत्तेजनार्थ
मधुराज् रेसिपी (मधुरा बाचल)
मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे

*नाटके / एकांकिका*
प्रथम पुरस्कार
बाबांचा वाडा चिरेबंदी (मायकल लोपीस)
डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई

उत्तेजनार्थ
आत्मबिंब आणि इतर (प्रकाश कामतीकर)
रजत प्रकाशन, औरंगाबाद

*धार्मिक / आध्यात्मिक*
प्रथम पुरस्कार
रंगरूप अभंगाचे (भास्कर हांडे)
विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे

उत्तेजनार्थ
निवडक अभंग (डॉ. विद्यासागर पाटंगणकर)
प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव

*विज्ञानविषयक*
प्रथम पुरस्कार
सेपिअन्स (युव्हाल नोआ हरारी) (अनुवाद – वासंती फडके)
डायमंड पब्लिकेशन्स्, पुणे

उत्तेजनार्थ
पुनर्जन्म-मिथ्य की तथ्य? (डॉ. विद्याधर ओक)
परम मित्र पब्लिकेशन्स्, पुणे

*शिशुसाहित्य*
प्रथम पुरस्कार
आभाळाची छत्री (माया धुप्पड)
अमीत प्रकाशन, जळगांव

उत्तेजनार्थ
हत्तीचा चष्मा (उर्मिला चाकूरकर)
इसाप प्रकाशन, नांदेड

*बालसाहित्य*
प्रथम पुरस्कार
खिडकी बाहेरचे जग (अशोक सोनवणे)
संस्कृती प्रकाशन, पुणे

उत्तेजनार्थ
रानाची हाक (म. वि. कोल्हटकर)
मधुराज पब्लिकेशन्स्, पुणे

*कुमार साहित्य*
प्रथम पुरस्कार
माझा शालेय परिपाठ (डॉ. पुरुषोत्तम भापकर)
साकेत प्रकाशन, औरंगाबाद

उत्तेजनार्थ
मार्टिन लुथर किंग (कीर्ती परचुरे)
कनक बुक्स, पुणे

*प्रकाशक-लेखक (प्रौढवाङ्मय)*
प्रथम पुरस्कार
लोकसंस्कृतीचे अंतरंग (प्रा. व. बा बोधे)
अक्षरबंध प्रकाशन पुणे

*प्रकाशक-लेखक (बालवाङ्मय)*
प्रथम पुरस्कार
ढोल ढगांचा वाजतो (उत्तम कोळगावकर)
प्राइम मीडिया, नाशिक

*मुखपृष्ठ (प्रौढ साहित्य)*
प्रथम पुरस्कार
संत कान्होेपात्रा- वल्लभ शिंदे
सप्तर्षी प्रकाशन

द्वितीय पुरस्कार
गावकुसाबाहेरची माणसं – सरदार जाधव
साकेत प्रकाशन

उत्तेजनार्थ
आई – अरविंद शेलार
सप्तर्षी प्रकाशन

*मुखपृष्ठ (बाल साहित्य)*
प्रथम पुरस्कार
अजरामर आल्फ्रेड नोबेल – संतुक गोळेगावकर
साकेत प्रकाशन

द्वितीय पुरस्कार
सुहास बालगीते – संतोष धोंगडे
स्नेहवर्धन प्रकाशन

*जाहिराती व ग्रंथप्रचार साहित्य*
प्रथम पुरस्कार
साकेत प्रकाशन सूची २०१८
साकेत प्रकाशन, औरंगाबाद

*दिवाळी अंक पुरस्कार २०१९*
*(विविध विभागांमधील पुरस्कार)*
प्रथम पुरस्कार
आवाज (विनोद)
आवाज प्रकाशन, बोरिवली

द्वितीय पुरस्कार
भन्नाट (विनोद)
शाकंभरी प्रकाशन

प्रथम पुरस्कार
गंधाली (ललित)
कुमुद मधुकर वर्तक, मुंबई

द्वितीय पुरस्कार
विशाखा (ललित)
पुष्पक प्रकाशन, पुणे

उत्तेजनार्थ
चतुरंग अन्वय (ललित)
चतुरंग प्रकाशन, सांगली

प्रथम पुरस्कार
समदा (संदर्भ)
समदा क्रिएशन, चिंचवड

द्वितीय पुरस्कार
मराठी विज्ञान परिषद पत्रिका (संदर्भ)
मराठी विज्ञान परिषद, मुंबई

उत्तेजनार्थ
माझे पुण्यभूषण (संदर्भ)
पुण्यभूषण फाऊंडेशन, पुणे

प्रथम पुरस्कार
शतायुषी (उपयुक्त व छंदविषयक)
डॉ. अरविंद संगमनेरकर, पुणे

द्वितीय पुरस्कार
वेदान्तश्री (उपयुक्त व छंदविषयक)
वेदान्तश्री प्रकाशन, पुणे

उत्तेजनार्थ
सुप्रजनन (उपयुक्त व छंदविषयक)
व्यास क्रिएशन्स्, ठाणे

प्रथम पुरस्कार
निर्मळ रानवारा (बालकुमार, किशोर)
वंचित विकास, पुणे

द्वितीय पुरस्कार
धमाल मस्ती (बालकुमार, किशोर)
भरारी प्रकाशन, विलेपार्ले

उत्तेजनार्थ
छावा (बालकुमार, किशोर)
केसरी-मराठी ट्रस्ट, पुणे

प्रथम पुरस्कार
शब्दालय (इतर)
शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर

द्वितीय पुरस्कार
शिवस्पर्श (इतर)
शिवस्पर्श प्रकाशन, पुणे

प्रथम पुरस्कार
शब्दमल्हार (मुखपृष्ठ)
पंकज बावडेकर (चित्रकार)

द्वितीय पुरस्कार
आश्लेषा (मुखपृष्ठ)
किरण हणमशेठ (चित्रकार)

उत्तेजनार्थ
छात्र प्रबोधन (मुखपृष्ठ)
निलेश जाधव (चित्रकार)

*सर्व पुरस्कार प्रकाशकांना दिले जातील!* *मुखपृष्ठांसाठीचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकारांना देण्यात येतील*