नमस्कार!
वर्ष २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे!
सर्व पुरस्कार प्राप्त प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!
(विभाग – पुस्तकाचे नाव – लेखकाचे नाव – प्रकाशकाचे नाव)
ललित प्रथम – घंटेवरले फुलपाखरू – ले. विजय पाडळकर – अभिजित प्रकाशन, पुणे
ललित द्वितीय – महावस्त्र – ले. रेखा बैजल – दिलीपराज प्रकाशन, पुणे
ललित उत्तेजनार्थ – मंतरलेली उन्हे – ले. तनुजा ढेरे – डिंपल पब्लिकेशन, मुंबई
ललितेतर प्रथम – हमरस्ता नाकारताना… – ले. सरिता आवाड – राजहंस प्रकाशन, पुणे.
ललितेतर द्वितीय – `वा!` म्हणताना… – ले. डॉ. आशुतोष जावडेकर – रोहन प्रकाशन, पुणे.
ललितेतर उत्तेजनार्थ – नट, नाटक आणि आपण – ले. त्र्यं. वि. सरदेशमुख – मौज प्रकाशन, मुंबई
संदर्भ प्रथम – साईसेवा – ले. डॉ. सुरेश हावरे – नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
संदर्भ द्वितीय – रायगड बालेकिल्ला – ले. गोपाळ चांदोरकर – बुकमार्क पब्लिकेशन्स, पुणे
संदर्भ उत्तेजनार्थ – रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट – ले. मनीषा बाठे – समर्थ मिडिया सेंटर, पुणे
उपयुक्त व छंदविषयक प्रथम – उद्योजक मी होणारच – ले. डॉ. विठ्ठल कामत – मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे
उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – करियरच्या दिशा – ले. दीपक नीलकंठ बिचे – यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
विज्ञानविषयक प्रथम – अंतराळ स्पर्धा – ले. अतुल कहाते – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
विज्ञानविषयक उत्तेजनार्थ – टेस्टट्यूब जन्मा तुझी कहाणी – ले. डॉ. पद्मिनी पाठक – कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
शिशुसाहित्य प्रथम – नाच रे बाळा – ले. सौ. माया दिलीप धुप्पड – प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव
शिशुसाहित्य उत्तेजनार्थ – मन माझं नाचतंय थुई थुई – ले. उत्तम कोळगावकर – प्राइम मीडिया, नाशिक
बाल साहित्य प्रथम – पाखरमाया – ले. शिवाजी चाळक – यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
बाल साहित्य उत्तेजनार्थ – चिमणी उडाली भुर्र… – ले. माया दिलीप धुप्पड – प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव
कुमार साहित्य प्रथम – बबडू बँकेत… – ले. विजय तांबे – रोहन प्रकाशन, पुणे.
कुमार साहित्य उत्तेजनार्थ – युद्ध नको! बुद्ध हवा! – ले. डॉ. सुरेश सावंत – इसाप प्रकाशन, नांदेड
मुखपृष्ठ (प्रौढ) प्रथम – अक्कलखाते – ले. डॉ. अमित करकरे – चित्रकार: सायली भगली-दामले – मधुश्री प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ (प्रौढ) द्वितीय – `वा!` म्हणताना… – ले. डॉ. आशुतोष जावडेकर – चित्रकार: अन्वर हुसेन
– रोहन प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ (प्रौढ) उत्तेजनार्थ – धुकं – ले. अनघा तांबोळी – चित्रकार: सरदार जाधव – डिंपल पब्लिकेशन, मुंबई
मुखपृष्ठ (बाल) प्रथम – अंधाराचं गाव – ले. स्वाती राजे – चित्रकार: राजेश भावसार
– रोहन प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ (बाल) द्वितीय – `ते` आंब्याचे दिवस – ले. ज्योती कपिले – चित्रकार: सतीश भावसार – जे. के. मीडिया, ठाणे
मुखपृष्ठ (बाल) उत्तेजनार्थ – चेटकिणीशी गट्टी जमली – ले. ज्ञानदा नाईक – चित्रकार: घन:श्याम देशमुख – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
सर्व पुरस्कार प्राप्त प्रकाशकांचे पुन:श्च मन:पूर्वक अभिनंदन!
यावर्षी कोरोनाच्या आक्रमणामुळे आलेल्या बंधनांमुळे परीक्षकांना एकत्र येऊन पुस्तक निवड करण्यास उशीर झाला. त्यामुळे हे पुरस्कार जाहीर करण्यासही विलंब झाला. आता जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून येत्या २३ एप्रिलचे सुमारास (त्यावेळची परिस्थिती पाहून) वर्ष २०१९ व वर्ष २०२० या दोन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्रित प्रदान करण्याचा संघाचा विचार आहे.
– अ. भा. मराठी प्रकाशक संघ कार्यकारिणी.