Press "Enter" to skip to content

उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार २०२०

नमस्कार!

आपल्या संघातर्फे दरवर्षी प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना निर्मिती पुरस्कार दिले जातात हे आपण जाणताच. या वर्षी अनेक आव्हानांचा सामना करून अनेकांनी आपली दिवाळी अंक प्रकाशित करावयाची परंपरा अबाधित ठेवली, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

त्यामुळे प्रकाशक संघही दर वर्षीप्रमाणे विविध विभागांत दिवाळी अंकांना पुरस्कृत करण्यास उत्सुक आहे.यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२० मध्ये प्रकाशित दिवाळी अंक आता मागवत आहोत. विनोदी, ललित, बाल-कुमार, किशोर, उपयुक्त व छंदविषयक व इतर विषय अशा विभागांबरोबरच उत्कृष्ट मुखपृष्ठांसाठीही पुरस्कार दिले जाणार आहेत.

*संघातर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव पुरस्कार असे आहेत की जे पुरस्कार उत्कृष्ट निर्मितीसाठी दिले जातात आणि ते अंकाच्या प्रकाशकांस दिले जातात.* तरी आपल्यापैकी ज्या मंडळींनी या वर्षी दिवाळी अंक प्रकाशित केले असतील त्यांनी आपल्या प्रकाशित झालेल्या अंकांची प्रत्येकी एक प्रत या स्पर्धेसाठी शुक्रवार दि. १५ जानेवारी २०२१ पर्यंत आपल्या संघाच्या खालील पत्त्यावर कुरीयरने अथवा समक्ष पाठवावी.

*अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ*२५१ क, शनिवार पेठ, मुठेश्वर चौक, पुणे-४११०३०.दूरध्वनी: ०२०-२४४८३०३१, ७३५००१५७५६.धन्यवाद!*

– प्रमुख कार्यवाह.*

55