Press "Enter" to skip to content

दुसरे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ व २९ डिसेंबर रोजी चिपळूण येथे दुसरे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष माननीय श्री. अनिल मेहता व स्वागताध्यक्ष माननीय डॉ. तानाजीराव चोरगे हे होते.

दिनांक २८ रोजी सकाळी ग्रंथदिंडीने या संमेलनास सुरुवात झाली.

दोन पूर्ण दिवसांच्या या संमेलनात श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत, ‘पुस्तक विक्रीच्या नव्या वाटा नव्या दिशा,’ ‘संवाद सर्जनशील कुटुंबाशी’, ‘प्रवास पुस्तक निर्मितीचा,’ अशा परिसंवाद व कार्यक्रमांची उपस्थितांसाठी मेजवानी होती. कविंसाठी खास आयोजित केलेल्या काव्यकट्ट्यासही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दिनांक २९ रोजी पोलीस अधीक्षक श्री.पोळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला.

संमेलनात संमेलन स्मरणिकेचे व विविध प्रकाशकांच्या नवीन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.

चिपळूणमधील अतिशय सुंदर वातावरणात साहित्य विश्वातील विविध गोष्टींचा व्यवस्थित उहापोह करणारे व विचार समृद्ध करणारा अविस्मरणिय अनुभव देणारे हे संमेलन ठरले अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.

संमेलनाला जोडून भव्य ग्रंथ प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रभरच्या प्रकाशक व पुस्तक विक्रेत्यांनी आपापली दालने तेथे उभारली होती.

– पराग लोणकर
(कार्यवाह)