Press "Enter" to skip to content

प्रकाशक संघाच्या कार्यकारिणी मध्ये बदल

आपल्या प्रकाशक संघाच्या कार्यकारिणी मध्ये काही बदल झाले आहेत. प्रमुख कार्यवाह नितीन गोगटे त्यांच्या तब्येतीच्या काहीशा तक्रारींमुळे गेले काही दिवस कार्यरत नाहीत,त्यांनी याच कारणासाठी आणखी काही दिवस प्रमुख कार्यवाह या जबाबदारीतून सुट्टी घेतली आहे,त्यामुळे प्रभारी प्रमुख कार्यवाह म्हणून श्री.पराग लोणकर यांची आणि त्यामुळे कार्यवाह म्हणून श्री.रमेश शेलार यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवीन प्रमुख कार्यवाह श्री.पराग लोणकर यांचा सत्कार करताना जेष्ठ उपाध्यक्ष सौ.शशिकला उपाध्ये आणि श्री.रमेश शेलार यांचा सन्मान करताना श्री.नितीन गोगटे.