अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, नागपूर, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकांच्या गावात भिलार येथे ८ आणि ९ डिसेंबर रोजी लेखक-प्रकाशक संमेलन होणार आहे.
सांस्कृतिक आणि शालेय शिक्षणमंत्री मा. विनोद तावडे, व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा समारंभ होणार आहे.
डाॅ. आशुतोष जावडेकर, डाॅ. श्रीपाल सबनीस, मा. बाबा भांड, ग्रंथालय संचालक राठोड साहेब यांसारख्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून हे संमेलन संपन्न होणार आहे.
प्रतिभासंपन्न मायलेकी वीणा देव आणि मृणाल देव-कुलकर्णी यांच्याशी संवाद, त्याचप्रमाणे गदिमा, पुल., बाबूजी जन्मशताब्दीनिमित्त दृकश्राव्य कार्यक्रम अशीही अनेक आकर्षणे या संमेलनात आहेत.
या संमेलनाकरिता पुणे-भिलार-पुणे असा ८ व ९ डिसेंबर या दोन्ही दिवसांचा प्रवास, उत्कृष्ट निवास, भोजन आणि इतर सोयी याकरिता माफक असे केवळ रु. १५००/- एवढे शुल्क ठेवण्यात आले आहे.
आपण या संमेलनात सहभाग घ्यावा याकरिता मुद्दाम मी व्यक्तीशः हे निवेदन आपणास पाठवित आहे.
*हे संमेलन लेखक-प्रकाशक व साहित्यप्रेमींच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल असा विश्वास वाटतो.*
नोंदणीकरिता
(१) श्री. पराग लोणकर (कार्यवाह- प्रकाशक संघ) – ९८५०९६२८०७
किंवा
(२) श्री. भास्कर ढोबळे (कार्यालयीन कार्यवाह) – ७३५००१५७५६
यांच्याशी संपर्क साधावा.
या संमेलनाकरिताचे शुल्क आपण अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या खालील बँक खात्यात परस्पर भरू शकता.
दोन्ही दिवसांची सविस्तर कार्यक्रम पत्रिका सोबत आहेच.
खात्याचा तपशील:-
*अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ*
बँक ऑफ महाराष्ट्र, शनिवार पेठ शाखा, पुणे.
A/C No. 20136942733
IFSC Code MAHB 0000675
खात्यात शुल्क जमा केल्यानंतर कृपया वरीलपैकी एका क्रमांकावर जरूर कळवावे.
आपला
राजीव बर्वे
अध्यक्ष- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ