Press "Enter" to skip to content

लेखक प्रकाशक कार्यशाळा जळगाव

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे डॉ. अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथे शुक्रवार दि. ७ व शनिवार दि. ८ सप्टेंबर २०१८ रोजी (दोन दिवस) लेखक व प्रकाशकांसाठी विशेष कार्यशाळा होणार आहे.

लेखन आणि प्रकाशन, संपादनाची आवश्यकता, स्वयंसंपादन, पुनर्लेखन, मुद्रितशोधन, ग्रंथनिर्मिती प्रक्रिया, प्रकाशनासाठी कॉपी तयार करणे, जीएसटी आणि कॉपीराइट कायदा, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आव्हान, ई बुक्स, पुस्तक व्यवसायाचे अर्थकारण- विक्री आणि विपणन आदी विषयांवर ही कार्यशाळा असेल. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी पुण्या-मुंबईची अनुभवी, तज्ञ मंडळी जळगाव येथे येत आहेत. या मंडळींशी संवाद साधण्याची संधीही प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे.

जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार व औरंगाबाद या पाच जिल्ह्यातील आपल्या माहितीचे जे लेखक व प्रकाशक असतील त्यांना कृपया या अतिशय चांगल्या व उपयुक्त कार्यशाळेसाठी सहभागी होण्यास सांगावे.

दोन दिवसांच्या या कार्यशाळेसाठी चहा, न्याहारी व भोजन या सर्वांसह केवळ ₹ १००/- एवढे नाममात्र शुल्क प्रकाशक संघाने मुद्दाम ठेवले आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी दि. ५ सप्टेंबर पूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :- श्री. युवराज माळी, जळगाव. (+91 97 64 694797)

Comments are closed.