Press "Enter" to skip to content

नाशिक शाखा

*एक महत्त्वाची व अतिशय आनंदाची बातमी आपणा सर्वांना कळवण्यासाठी हे निवेदन*

आपला प्रकाशक संघ एक मोठी झेप घेत आहे. प्रकाशक संघ हा महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेरही विविध उपक्रम राबवत असतो हे आपण जाणताच. या उपक्रमांची व्याप्ती आणखी वाढावी यासाठी विविध विभागांमध्ये प्रकाशक संघाच्या शाखा असाव्यात असा विचार गेल्या काही महिन्यांपासून कार्यकारिणीपुढे चालू होता व या संदर्भातले काम गेले चार-पाच महिने चालू होते.

नाशिक, धुळे, नंदुरबार या विभागामध्ये साहित्यविषयक काम मोठ्या प्रमाणात दिसते. लेखक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, ग्रंथालये अशा सर्वच विभागात येथे उल्लेखनीय कार्य चाललेले असते. त्यामुळे प्रकाशक संघाच्या शाखा विस्तारामध्ये प्रथम शाखा म्हणून *नाशिक विभागाची* निवड करण्यात आली.

या प्रकाशक संघाच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहोळा शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी संध्याकाळी ५.३० वाजता दिमाखात पार पडत आहे. सोबत निमंत्रणपत्रिकाही देत आहोत.

या उद्घाटन कार्यक्रमास जोडून नाशिक शाखेचा पहिला उपक्रम म्हणून तेथे भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले जाणार असून या ग्रंथप्रदर्शनात आपण साऱ्यांनी प्रकाशक संघाकडे दिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे.

आपल्या सर्वांसाठीच मोठ्या अभिमानाची बाब असलेल्या या आनंदसोहळ्यासाठी ज्या ज्या मंडळींना उद्घाटन सोहळ्यास नाशिक येथे येणे शक्य असेल त्यांनी जरूर यावे ही आम्हा सर्व कार्यकारिणी सदस्यांकडून आग्रहाची व नम्र विनंती आहे.

धन्यवाद!

आपले,
*अध्यक्ष, उपाध्यक्ष‍ा व सर्व कार्यकारिणी सदस्य*