Press "Enter" to skip to content

प्रकाशक संघाच्या उत्कृष्ट ग्रंथ व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार सोहोळ्यासंबंधी

आपला २०१९ व २०२० या दोन वर्षांचा उत्कृष्ट ग्रंथ (निर्मिती) व दिवाळी अंक (निर्मिती) पुरस्कारांचा सोहोळा तसेच जीवन गौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार या दोन पुरस्कारांचा प्रदान सोहळा (राजहंसचे मा. दिलीप माजगावकर आणि सुप्रसिद्ध साहित्यिका मा. प्रतिभाताई रानडे यांना देण्याचा) रविवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी मनोहर मंगल कार्यालय येथे निश्चित झालेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. मिलिंद जोशी भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर यांची सन्माननीय उपस्थिती आपल्याला लाभणार आहे.

कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे हा सोहोळा आपल्याला खूप लांबवावा लागला. आत्ताही बंधने शिथिल झालेल्या काळात खूप तातडीने हे सर्व आयोजन करावे लागत आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना निमंत्रण संदेश/पत्रे पाठवली जाणार असली तरी कृपया हे संदेश/पत्रे मिळाली नाहीत, तरी या आपल्या कौटुंबिक सोहोळ्यास व कौतुकाच्या सन्मानास आपण अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आपण सर्वजण एकमेकांना भेटलो नाही अशी रास्त तक्रार मध्यंतरी झाली होती. आता यामुळे सर्वांचे संमेलन (गेट टू गेदर) चांगले होईल. भोजन समारंभानंतर कार्यक्रम संपेल. सविस्तर कार्यक्रम पत्रिका लवकरच देत आहे.

कार्यक्रमास नेहमीप्रमाणेच कोणतेही शुल्क नाही पण प्रकाशक संघाची चालू वर्ष अखेर वर्गणी भरलेली असणे आवश्यक आहे.

कोरोना संबंधित नियम पाळण्याच्या दृष्टीने व एकूणच सर्व आयोजनाच्या दृष्टीने सर्व पुरस्कार विजेते आणि आपल्या अ.भा.म. प्रकाशक संघाच्या सदस्यांनी कृपया आपल्या कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे यांना (९८८१४३५६८० या क्रमांकावर) आपण येत असल्याचा मेसेज करून (एक किंवा दोन जण) कृपया कळवावे ही विनंती.

सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून यावे. कोरोनोत्तर सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न होईल.

– पराग लोणकर

(प्रमुख कार्यवाह.)